
नांदेड, 11 एप्रिल (हिं.स.)। नांदेड जिल्ह्याच्या काही भागात शनिवारी (11 एप्रिल) भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, ज्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्ह्यातील काही गावांमध्ये जमीन हादरल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.7 इतकी नोंदवण्यात आली. लातूर भूकंप मापन केंद्रातीन यंत्रावर याची नोंद झाली असून सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि घाबरून न जाता सुरक्षिततेच्या उपाययोजना पाळण्याचे निर्देश दिले आहेत. नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis