‘जन नायकन’ चित्रपट लीक प्रकरणावर संताप : रजनीकांत आणि कमल हासन विजयच्या समर्थनात
चेन्नई, 11 एप्रिल (हिं.स.)।थलापती विजय यांचा शेवटचा चित्रपट जन नायकन हा सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. मात्र, हा चित्रपट रिलीजपूर्वीच ऑनलाइन लीक झाल्याची घटना समोर आली आहे. जन नायकन ऑनलाइन उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा एकदा पायरसीबाबत चर्चा र
‘जन नायकन’ चित्रपट लीक प्रकरणावर संताप: रजनीकांत आणि कमल हासन विजयच्या समर्थनात


चेन्नई, 11 एप्रिल (हिं.स.)।थलापती विजय यांचा शेवटचा चित्रपट जन नायकन हा सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. मात्र, हा चित्रपट रिलीजपूर्वीच ऑनलाइन लीक झाल्याची घटना समोर आली आहे. जन नायकन ऑनलाइन उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा एकदा पायरसीबाबत चर्चा रंगू लागली आहे. आता रजनीकांत आणि कमल हसन यांनी विजयच्या समर्थनार्थ भूमिका घेत चित्रपट लीक झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

रजनीकांत यांनी त्यांच्या एक्स हँडलवर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली. त्यांनी लिहिले, “इंटरनेटवर जन नायकन चित्रपट लीक झाल्याचे ऐकून मला तीव्र धक्का बसला असून खूप दुःखही झाले आहे. फिल्म असोसिएशनने याविरोधात आवाज उठवावा आणि सरकारने जबाबदार व्यक्तींची ओळख पटवून त्यांना कठोर शिक्षा द्यावी. भविष्यात अशा प्रकारचे गुन्हे सुरू राहू नयेत.”

कमल हासन यांनीही विजयच्या समर्थनार्थ ट्विट करत या लीक प्रकरणाला ‘सिस्टेमॅटिक फेल्युअर’ असे म्हटले. त्यांनी लिहिले,

“जन नायकन चे लीक होणे हा अपघात नाही, तर हा व्यवस्थेचा अपयश आहे. योग्य प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली असती, तर आपण आज या परिस्थितीत नसतो. सर्टिफिकेशनमधील विलंबामुळे पायरसीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले. जेव्हा कायदेशीर मार्गाने प्रवेश कठीण होतो, तेव्हा बेकायदेशीर मार्ग आपोआप पुढे येतात. पायरसी ही राजकारणाच्या पलीकडची बाब आहे—ती थेट कला आणि कलाकारांवर हल्ला आहे.”

कमल हासन यांनी पुढे म्हटले की, चित्रपट लीक झाल्यामुळे शेकडो कलाकार आणि कर भरणाऱ्या निर्मात्यांसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. “जेव्हा व्यवस्था अपयशी ठरते, तेव्हा निर्मात्यांचे संरक्षण कोण करणार? आपल्याला उत्तरदायित्व, जलद सर्टिफिकेशन प्रक्रिया, कडक नियमांची अंमलबजावणी आणि रिअल-टाइममध्ये कंटेंट हटवण्याची गरज आहे.”त्यांनी असेही नमूद केले की, या विरोधात संपूर्ण चित्रपटसृष्टीने एकत्र येऊन आवाज उठवणे आवश्यक आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande