
बीड, 12 एप्रिल (हिं.स.)। भवानी विद्यार्थी कल्याण प्रतिष्ठान, शांतिवन यांच्या वतीने आयोजित ४५ वे मराठवाडा साहित्य संमेलन आर्वी येथे उत्साहात सुरू असून संमेलनाचा शुभारंभ झाला.
संमेलनाच्या विविध साहित्यिक कार्यक्रमांमध्ये कवी विठ्ठल बीडकर व्यासपीठावर कथाकथनाचा बहारदार कार्यक्रम पार पडला. या सत्राच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक डॉ. भास्कर बडे उपस्थित होते. कार्यक्रमात विविध कथाकारांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत कथा सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. नांदेड येथील कथाकार बालाजी इवितदार यांनी ग्रामीण वास्तवावर भाष्य करणारी 'बिझनेस' ही कथा प्रभावीपणे सादर केली. त्यांच्या कथेतून ग्रामीण भागातील बदलते सामाजिक व आर्थिक चित्र जिवंतपणे उभे राहिले.
यानंतर देवणी येथील हास्यकवी शिवाजी बिरादार यांनी 'ग्रामीण भागातील शाळेची पटपडताळणी' ही विनोदी कथा सादर करत उपस्थितांना खळखळू हसवले. त्यांच्या सादरीकरणाला रसिकांनी तुफा दाद दिली. पुढे बबन आव्हाड (परभणी), स्वात कान्हेगावकर आणि गोरक्ष शेंद्रे यांनीही आपापल्य कथांद्वारे विविध सामाजिक विषयांना स्पर्श कर कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रमाचे सुत्रसंचाल आप्पासाहेब तांबे यांनी केले. कथाकथनाच्या सत्राला साहित्यप्रेमींची मोठी उपस्थिती लाभली असू बाबा आमटे साहित्यनगरीत साहित्यिक वातावर अधिकच रंगतदार झाले .
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis