
बीड, 12 एप्रिल (हिं.स.)।
माजलगाव तालुक्यातील वाळू घाटांवर होत असलेले अवैध उत्खनन आणि ई-टीपी नियमांच्या उल्लंघनामुळे उपविभागीय अधिकारी यांनी तालुक्यातील सर्व ८ वाळू घाट तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. महाखनिज प्रणालीमधील पडताळणीत असे दिसून आले की, वाळू वाहतूक करणारी वाहने जीपीएसनुसार ठरवून दिलेल्या मार्गावर न जाता अन्य ठिकाणी जात होती. अतिरिक्त उत्खननाच्या तक्रारी महसूल मंत्र्यांपर्यंत पोहोचल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, आदेशानंतरही कोणत्याही लिलावधारकाने उत्खनन किंवा वाहतूक सुरू ठेवल्यास ती अवैध समजली जाईल आणि संबंधितांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल. या कारवाईमुळे बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis