
सोलापूर, 12 एप्रिल (हिं.स.)।
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या सामाजिक सप्ताहाच्या अनुषंगाने सभापती संस्कृती सातपुते यांच्या संकल्पनेतून यंदा प्रथमच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आणि संत गाडगेबाबा यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील अकरा पंचायत समितीमध्ये 14 एप्रिल रोजी ही स्पर्धा होणार असून इयत्ता सातवी ते बारावी दरम्यानच्या विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी होता येणार आहे. स्पर्धेतील तीन विजेत्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम 11000, द्वितीय 9000 आणि तृतीय 7000 असे रोख बक्षीस देण्यात येणार असून हा बक्षीस वितरण समारंभ एक मे महाराष्ट्र दिनी होणार आहे. या सर्व स्पर्धेचे व्हिडिओ स्वरूपात डॉक्युमेंटेशन करण्यात येणार असल्याचेही सभापती सातपुते यांनी सांगितले.स्पर्धेचे विषय खालीलप्रमाणेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले कार्यउदाहरणार्थ-मतदानाचा हक्क, वारसा हक्क, प्रसूती रजेचा हक्कचवदार तळे, महाड-शताब्दी वर्ष विशेषमानवी हक्कांचे महत्त्वसंत गाडगे महाराज यांच्या कार्याचा गौरव (150 वी जयंती)
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड