
बीड, 12 एप्रिल (हिं.स.)।
अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोमनवाडी शिवारात स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत धाबा चालक याला बेकायदेशीर गावठी पिस्टलसह रंगेहात अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी आपल्या धाब्यावर शस्त्र बाळगून होता. पोलिसांनी छापा टाकून ४० हजार रुपये किमतीची गावठी बनावटीची पिस्टल जप्त केली आहे. या प्रकरणी पोलीस नाईक गोविंद भताने यांच्या फिर्यादीवरून बर्दापूर पोलीस ठाण्यात आर्म्स ॲक्टच्या कलम ३/२५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत आणि अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. सध्या आरोपी आणि जप्त केलेले मुद्देमाल पुढील तपासासाठी बर्दापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis