
बीड, 12 एप्रिल (हिं.स.)।
मराठवाड्याच्या रेल्वे स्वप्नाला गती देणाऱ्या अहिल्यानगर-बीड-परळी या २६१ किमी रेल्वे प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी ११ एप्रिल रोजी मोजेड ट्रॉलीवरून बीड ते परळी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला. मे २०२६ अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून यामुळे अहिल्यानगर ते बीड हा १६७ किमीचा प्रवास साडेचार तासांऐवजी केवळ अडीच तासांत पूर्ण होणार आहे. प्रवासाचा वेळ वाचणार असून परळी तालुक्यातील उन्नत पुलांची कामे वेगाने सुरू आहेत. प्रलंबित भू-संपादनाचे प्रश्न आता मार्गी लागले असून केंद्र आणि राज्य सरकारच्या ५०-५० टक्के खर्चाच्या भागीदारीतून हा प्रकल्प साकारत आहे. स्थानिक व्यापार आणि पर्यटनाला यामुळे मोठी चालना मिळणार असून केवळ धारूर तालुक्यातील देवदहिफळ येथील प्रक्रिया सध्या प्रगतीपथावर आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis