परभणी 51 रक्तदात्यांचे रक्तदान; महात्मा फुले मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम
परभणी, 12 एप्रिल (हिं.स.)। महात्मा फुले जयंतीनिमित्त बोरी येथील महात्मा फुले मित्र मंडळाच्या वतीने माळी गल्लीतील जगदंबा देवी मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात एकूण 51 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले.
अ


परभणी, 12 एप्रिल (हिं.स.)।

महात्मा फुले जयंतीनिमित्त बोरी येथील महात्मा फुले मित्र मंडळाच्या वतीने माळी गल्लीतील जगदंबा देवी मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात एकूण 51 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. समाजोपयोगी कार्याच्या या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय चौधरी, जिल्हा परिषद सदस्या दिपालीताई चौधरी, ग्रामपंचायत प्रशासक निर्मलाताई चौधरी, माजी जि.प. सदस्य पंडितराव घोलप आदींची प्रमुख उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande