बंद घर फोडून चोरी; माणगावात 2.65 लाखांचा ऐवज लंपास
रायगड, 12 एप्रिल (हिं.स.)। माणगाव पोलीस ठाणे हद्दीत बंद घर फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात अज्ञात चोरट्याने तब्बल 2 लाख 65 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Burglary-after-breaking-into-a

रायगड, 12 एप्रिल (हिं.स.)। माणगाव पोलीस ठाणे हद्दीत बंद घर फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात अज्ञात चोरट्याने तब्बल 2 लाख 65 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मौजे समर्थकठपा, वाकडाईनगर उत्तेखोल (ता. माणगाव) येथील महिला फिर्यादी यांच्या बंद घरावर चोरट्यांनी डल्ला मारला. घराच्या पाठीमागील दरवाजाला धक्का देऊन तो उघडण्यात आला आणि त्याद्वारे घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी करण्यात आली.

फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या उद्देशाने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ही चोरी करण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 110/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 305(a), 331(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार फडताडे करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना घर बंद ठेवताना योग्य सुरक्षा उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)

 rajesh pande