बीड : अंबाजोगाई कृषी उपविभागात २० एप्रिलपासून राबवणार 'सीआरटी' प्रात्यक्षिक मोहीम
बीड, 12 एप्रिल (हिं.स.)। अंबाजोगाई उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या केज, परळी व अंबाजोगाई तालुक्यातील १७० गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची (एनडीकेएसपी) आढावा बैठक उपविभागीय कृषी अधिकारी राहुल गायकवाड यांच्या अध्यक्षते
बीड : अंबाजोगाई कृषी उपविभागात २० एप्रिलपासून राबवणार 'सीआरटी' प्रात्यक्षिक मोहीम


बीड, 12 एप्रिल (हिं.स.)। अंबाजोगाई उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या केज, परळी व अंबाजोगाई तालुक्यातील १७० गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची (एनडीकेएसपी) आढावा बैठक उपविभागीय कृषी अधिकारी राहुल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

या बैठकीत डी.बी.टी. पोर्टलवरील प्रलंबित अर्जाचा तात्काळ निपटारा करण्याच्या सूचना देऊन २० एप्रिल ते ३० मे या कालावधीत प्रत्येक

गावामध्ये 'सीआरटी अभियान' अंतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक आणि जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोहिमेच्या अनुषंगाने तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी सविस्तर मार्गदर्शन करत हवामान अनुकूल तंत्रज्ञान राबवताना आवश्यक असणारे तांत्रिक साहित्य, प्रात्यक्षिक प्रशिक्षण देताना लक्षात घ्यावयाच्या बाबी आणि खरीप पूर्व नियोजनावर भर दिला.

यामध्ये प्रामुख्याने बीबीएफ तंत्रज्ञान प्रात्यक्षिक देण्यासाठी यंत्र उपलब्धता, टोकन पद्धतीने पिकांची लागवड करण्यासाठी सरी वरंबे तयार करणे, बीजप्रक्रिया, बियाणे उगवणक्षमता तपासणी, शून्य मशागत आणि 'दहा ड्रम थेअरी'द्वारे सेंद्रिय निविष्ठा व दशपर्णी अर्क तयार करण्याच्या पद्धतीवर येळकर यांनी विशेष प्रकाश टाकून महाविस्तार एआय अॅपवर कीड-रोगांचे निरीक्षण नोंदवण्याबाबत सूचना देऊन समूह सहाय्यकांना जमीन सुपीकता आणि पीक संरक्षणाशी संबंधित माहितीपुस्तिकांचे वाटप केले. लेखा अधिकारी रवी मुंडे यांनी डीबीटी एप्लीकेशनमधील तांत्रिक अडचणींबाबत मार्गदर्शन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande