बीडमध्ये गोवंशाची निर्दयी वाहतूक उघड; लिंबागणेश येथे पिकअप अडवून कारवाई
बीड, 12 एप्रिल (हिं.स.)। बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे गोवंशाची अत्यंत निर्दयी वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार भालचंद्र विद्यालयासमोर उघडकीस आला. धाराशिव येथील पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोहित बागल व त्यांच्या सहकाऱ्यांनी संशयित पिकअप अड
बीडमध्ये गोवंशाची निर्दयी वाहतूक उघड; लिंबागणेश येथे पिकअप अडवून कारवाई


बीड, 12 एप्रिल (हिं.स.)। बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे गोवंशाची अत्यंत निर्दयी वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार भालचंद्र विद्यालयासमोर उघडकीस आला. धाराशिव येथील पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोहित बागल व त्यांच्या सहकाऱ्यांनी संशयित पिकअप अडवून ही कारवाई केली.

तपासणी दरम्यान पिकअपमध्ये ७ते ८ गायी एकमेकांना घट्ट बांधून निर्दयीपणे कोंडल्याचे आढळले. यात एका गायीचा मृत्यू झाला आहे. वाहन अडवल्यानंतर आरोपींनी पोलिस विभाग आमचाच आहे असे म्हणत स्थानिक नेत्याच्या नावाखाली गोरक्षकांना धमकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, युवकांनी न डगमगता नेकनूरचे सपोनि चंद्रकांत गोसावी यांना माहिती दिली. त्यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक नितीन धायगुडे, पोलिस कॉन्स्टेबल विद्वान कांबळे व गणेश परजने यांनी घटनास्थळी धाव घेत वाहन व गोवंश ताब्यात घेतला.या धाडसी कारवाईत सरपंच बाळासाहेब जाधव, विकी वाणी, सत्यम मंडलिक, लखन कानिटकर, लखन राऊत, अनिल कुलकर्णी, ओंकार तागड आदी युवकांनी सक्रिय सहभाग घेतला.जखमी गायींना उपचारासाठी गोशाळेत हलवण्यात आले असून, पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे सांगण्यात आले.

----

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande