लोहा तालुक्यातील कापशी बु. येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर'
नांदेड, 12 एप्रिल (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या ‘लोककल्याणकारी’ धोरणांतर्गत आणि महसूल प्रशासनाच्या पुढाकाराने लोहा तालुक्यातील तिसरे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर’ कापशी बु येथे अत्यंत उत्साहात पार पडले. या शिबिरच्या माध्
Q


नांदेड, 12 एप्रिल (हिं.स.)।

महाराष्ट्र शासनाच्या ‘लोककल्याणकारी’ धोरणांतर्गत आणि महसूल प्रशासनाच्या पुढाकाराने लोहा तालुक्यातील तिसरे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर’ कापशी बु येथे अत्यंत उत्साहात पार पडले. या शिबिरच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ आणि प्रलंबित प्रशासकीय कामे एकाच छताखाली पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या शिबिरात आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या हस्ते यावेळी लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

सदरील शिबिर हे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या प्रेरणेने व सहाय्यक जिल्हाधिकारी तथा कंधार उपविभागीय अधिकारी अनन्या रेड्डी, लोहा तहसिलदार विठ्ठल परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कापशी बु येथे आयोजित करण्यात आले. शिबिरामध्ये महसूल, कृषी,आरोग्य,पंचायत समिती, भूमी अभिलेख, जि.प.बांधकाम विभाग, दुय्यम निबंधक, पशुधन विकास तसेच शिक्षण विभाग अशा विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना शासनाच्या आपापल्या विभागातील विविध योजनांची सविस्तर माहिती देत लाभार्थ्याकडून अर्ज स्वीकारले.

तहसील कार्यालय लोहा यांच्यावतीने शिबिरात महसुली सेवांचे मोठ्या प्रमाणावर वितरण करण्यात आले. यामध्ये ऑनलाईन सातबारा उतारे व आठ-अ उतारे फेरफार उतारे नागरिकांना देण्यात आले. तसेच 11 पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ प्रदान करण्यात आला. याशिवाय सातबारा व फेरफार, 16 नवीन शिधापत्रिका चे वाटप करण्यात आले त्यासोबतच शिधापत्रिका दुरुस्त्या संदर्भातील अर्जही स्वीकारण्यात आले. शिबिरामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र असे एकूण 30 प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले, सातबारा, ८-अ उतारे, सातबारा दुरुस्ती, फेरफार नोंदी आदी महसुली सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच आरोग्य विभाग, भूमिअभिलेख विभाग व पंचायत विभागानेही नागरिकांना विविध सेवा पुरवल्या.

नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, अशा प्रकारच्या शिबिरांमुळे ग्रामीण भागातील सामान्य माणसाला मोठा दिलासा मिळत असल्याची भावना व्यक्त केली आहे. “शासन नागरिकांच्या दारी येऊन त्यांच्या समस्या सोडवत आहे. समाधान शिबिरामुळे नागरिकांचा वेळ व पैसे दोन्ही वाचले आहेत,” असे मत उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande