अमरावतीत पावसाळ्यापूर्वी नालेसफाईला वेग; पूरस्थितीचा सामना करण्यासाठी मनपाची पूर्वतयारी
अमरावती, 12 एप्रिल (हिं.स.)। महानगरातील सोळा मोठ्या नाल्यांच्या साफसफाईस महापालिकेने प्रारंभ केला आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्यात येते. त्यासाठी मनपाकडील दोन व भाड्याच्या चार, अशा पोकलेन मशीनने सफाईच्या कामास सुरवात झाली आहे. पावसाळ्य
शहरातील मोठ्या नाल्यांच्या साफसफाईस प्रारंभ पावसाळ्यातील पूरस्थितीचा सामना करण्यासाठी महानरगपालिकेची पूर्वतयारी


अमरावती, 12 एप्रिल (हिं.स.)। महानगरातील सोळा मोठ्या नाल्यांच्या साफसफाईस महापालिकेने प्रारंभ केला आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्यात येते. त्यासाठी मनपाकडील दोन व भाड्याच्या चार, अशा पोकलेन मशीनने सफाईच्या कामास सुरवात झाली आहे. पावसाळ्यात मोठ्या नाल्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन नाल्याकाठच्या वसाहतींना धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर नालेसफाई करण्याची मागणी नगरसेवक मिलिंद बांबल यांनी केली होती. मनपा आयुक्तांनी नालेसफाईची मोहीम युद्धपातळीवर राबवून त्यामधील गाळ व कचरा काढून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्याचे निर्देश दिले.

या मोहिमेत भाजीबाजार परिसरातील ताजनगर, वडाळीपासून सुरू होणारा आंबानाला, महादेव खोरी परिसरातील नाला तसेच मोशी कॉलनी आणि मसानगंज येथील नाल्यांचा समावेश आहे. या सर्व नाल्यांची प्रभावी साफसफाई करून पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी तुंबण्याच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्याचा उद्देश आहे. सध्या या कामासाठी दोन मनपाच्या आणि चार भाड्याने आणलेल्या पोकलेन मशीन तैनात करण्यात आल्या आहेत. नाल्यात साचलेला गाळ, प्लॅस्टिक कचरा, झाडाझुडुपांचे अवशेष आणि इतर अडथळे काढण्याचे काम वेगाने सुरू आहे.

विशेषतः ताजनगर नाला हा महत्त्वाचा जलवाहिनीचा भाग असल्याने त्याच्या स्वच्छतेला प्राधान्य दिले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबणे, रस्त्यांवर पाणी येणे, दुर्गंधी निर्माण होणे आणि आरोग्यविषयक समस्या वाढणे, अशा अडचणी निर्माण होत होत्या. भाजीबाजार परिसरातील व्यापारी आणि रहिवाशांनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी तातडीने कारवाईचे निर्देश दिल्यानंतर प्रशासनाच्या देखरेखीखाली नियोजनबद्ध पद्धतीने नालेसफाई सुरू करण्यात आली आहे. पोकलेन मशीनच्या साहाय्याने संपूर्ण नाल्याची टप्प्याटप्याने साफसफाई केली जात असून, पाण्याचा प्रवाह मोकळा करण्यावर भर दिला जात आहे. काम सुरू असताना नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. तसेच काम सुरक्षित व जलदगतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande