
परभणी, 12 एप्रिल (हिं.स.)।
काँग्रेस पक्षाच्या “संघटन सृजन अभियान” अंतर्गत सेलू शहरात साईबाबा नागरी बँकेच्या मुख्य कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यात आल्या.
या वेळी केंद्रीय निरीक्षक अजमतुलाह हुसेनी, परभणी जिल्ह्याचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, पक्ष निरीक्षक जितेंद्र देहाडे, सेलू तालुका काँग्रेस निरीक्षक देवकते, दादासाहेब मुंढे, आलमगीर खान, बाळासाहेब देशमुख, सिद्धार्थ हत्तीआंबिरे, अजित वरपुडकर, मुजाहेद खान, नागसेन भेरजे, तालुका अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच नगरपालिकेचे गटनेते तथा माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, नगरसेवक मिलिंद पवार, अमजद बागवान, अन्वर खान, विनोद धापसे, आत्माराम साळवे, मुश्ताक रब्बानी, विनोद तरटे, नृसिंह हरणे, रमजानी बागवान, बासू कच्ची यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी हेमंतराव आडळकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. माजी नगराध्यक्ष हेमंत आडळकर यांनी प्रस्ताविकातून अभियानाचा उद्देश स्पष्ट केला. पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी आणि संघटन बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांचे मत जाणून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis