रत्नागिरी : जगबुडी नदीच्या पुलावर कंटेनरला अपघात
रत्नागिरी, 12 एप्रिल, (हिं. स.) : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे नाका (ता. खेड) येथील जगबुडी नदीच्या पुलावर आज सकाळी सुमारे ७ वाजता भीषण अपघात घडला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मालवाहू कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनरने दुभाजक तोडत थ
जगबुडी पुलावर कंटेनरला झालेला अपघात


रत्नागिरी, 12 एप्रिल, (हिं. स.) : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे नाका (ता. खेड) येथील जगबुडी नदीच्या पुलावर आज सकाळी सुमारे ७ वाजता भीषण अपघात घडला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मालवाहू कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनरने दुभाजक तोडत थेट दोन पुलांच्या मधोमध जाऊन अडकला.

अपघातावेळी कंटेनरचा अर्धा भाग हवेत लटकत नदीच्या दिशेने झुकलेला होता. त्यामुळे तो सुमारे २०० फूट खोल जगबुडी नदीत कोसळण्याची भीती निर्माण झाली होती. काही काळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. मोठ्या प्रयत्नाननंतर दोन क्रेनच्या सहाय्याने अडकलेला कंटेनर सुरक्षित बाहेर काढण्यात आला. या अपघातात कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी हलविण्यात आले.

दरम्यान, कंटेनर बाहेर काढण्याचे काम सुरू असताना मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी एक लेन सुमारे दीड तास बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande