पुण्यात सायबर सुरक्षा विषयक मोफत मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
पुणे, 12 एप्रिल (हिं.स.)। सायबर गुन्ह्यांचेवाढते प्रमाण लक्षातघेता, सायबर फसवणुक टाळण्यासाठी जनजागृती व सजगताबाळगणे आवश्यक असल्याचे मत सायबर सुरक्षा विषयक मोफत कार्यशाळेत व्यक्त करण्यात आले. डिजिटल टास्क फोर्सव यशस्वीएकेडमी फॉर स्किल्स यांच्या संयु
पुण्यात सायबर सुरक्षा विषयक मोफत मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न


पुणे, 12 एप्रिल (हिं.स.)। सायबर गुन्ह्यांचेवाढते प्रमाण लक्षातघेता, सायबर फसवणुक टाळण्यासाठी जनजागृती व सजगताबाळगणे आवश्यक असल्याचे मत सायबर सुरक्षा विषयक मोफत कार्यशाळेत व्यक्त करण्यात आले. डिजिटल टास्क फोर्सव यशस्वीएकेडमी फॉर स्किल्स यांच्या संयुक्तविद्यमाने शिवाजीनगरयेथील संतमाईस्किल डेव्हलपमेंट सेंटर येथे सायबर सुरक्षा विषयक मोफत मार्गदर्शनकार्यशाळा आयोजितकरण्यात आली होती.

या कार्यशाळेत सायबर फसवणूक होण्यापासून स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे,तसेच सायबर फसवणुकीचे प्रकार कसे असतात,यासाठी डिजिटल साधने वापरताना नेमकी कशी काळजी घ्यावी यबद्दलही प्रात्यक्षिकाद्वारे डिजिटल टास्कफोर्सचे सायबर तज्ञ् अमित कांबळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की,मोबाईलचा वापर करतानागरजेपुरत्या ऍप्सचाच वापर करावा आणि सायबर गुन्हा घडल्यास पोलिसांशीतात्काळ संपर्क साधावा.

सध्या सर्वत्रडिजिटल साधनांचा वापर सर्वाधिकहोत असल्याचे दिसत आहे,अशातच दुसरीकडे सायबर गुन्हेगार चलाखीने मोबाईल,संगणक,इंटरनेट अशा डिजिटल उपकरणांच्या वापरकर्त्यांना वेगवेगळ्या प्रकारे फसवित आहेत. दर एक दिवसाआड वर्तमानपत्रात सायबर फसवणुकीमुळे लाखो करोडो रुपयांचे नुकसान झाल्याच्याबातम्या वाचनात येत आहेत.याबाबत जनजागृती व्हावी,या हेतूने सदर कार्यशाळाआयोजितकेल्याचे यशस्वी एकेडमी फॉरस्किल्स संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ यांनी सांगितले.या कार्यशाळेत डीटीएफचे कायदेशीर सल्लागार आणि मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत असलेले ॲड. विशाल ओव्हल यांनीसायबर सुरक्षा व एथिकल हॅकिंगबाबतमार्गदर्शन केले.यावेळी डिजिटल टास्कफोर्सचे प्रमुख ज्येष्ठ सायबर तज्ञ्डॉ. रोहनन्यायाधीश,यांच्यासहसंतमाईस्किल्स डेव्हलपमेंट सेंटरच्या केंद्र प्रमुखहिना खान तसेच डिजिटल टास्क फोर्सचे पदाधिकारी उपस्थितहोते. या कार्यशाळेत युवक-युवतींसह मध्यमवयीन नागरिक देखील सहभागी झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande