
लातूर, 12 एप्रिल (हिं.स.)
औसा पंचायत समिती येथे रेशीम उद्योगाच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. औसा तालुका राज्यातील रेशीम उत्पादनाचे प्रमुख केंद्र (हब) म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली.
या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, जिल्हा रेशीम विकास अधिकारी एस. बी. वराट, गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे, पंचायत समिती सभापती गंगाबाई कोदळीकर, उपसभापती अमोल पाटील, औसा महिला अॅग्रो प्रोड्यूसर कंपनीच्या
आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत बैठक
अध्यक्षा सौ. शोभाताई पवार, पंचायत समिती सदस्य समाधान कांबळे, तालुका कृषी अधिकारी औसा विकास लटूरे, तालुका कृषी अधिकारी निलंगा नाथराव शिंदे व निलंगा येथील प्रतिनिधी, औसा व निलंगा तालुक्यातील उमेद प्रभाग समन्वयक, तसेच महिला संचालक उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी रेशीम उद्योग हा अत्यंत प्रभावी आणि शाश्वत पर्याय ठरू शकतो, असे सांगून आमदार पवार म्हणाले की, कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारी रेशीम शेती ही उसासारख्या जास्त
पाणी लागणाऱ्या पिकांना सक्षम पर्याय ठरू शकते. बदलत्या हवामान आणि वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
बैठकीत औसा तालुक्यातील प्रत्येक गावात रेशीम शेतीचा प्रसार करण्याचा ठोस संकल्प करण्यात आला. तसेच राज्य शासनाकडून उपलब्ध असलेल्या १०० टक्के अनुदानाचा अधिकाधिक लाभशेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन संबंधित अधिकाऱ्यांनी केले. औसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रेशीम उद्योग ही मोठी संधी असून, त्या दृष्टीने प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis