दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळा २४ एप्रिलला
पुणे, 12 एप्रिल (हिं.स.)। दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान आणि हृदयेश आर्टस् यांच्यातर्फे आयोजित दीनानाथ मंगेशकर पुरस्कार वितरण सोहळा आणि ‘मी लता दीनानाथ’ सांगीतिक मैफील’, असा कार्यक्रम २४ एप्रिलला सायंकाळी पाच ते रात्री १० या वेळेत स्वारगेटच्या
दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळा २४ एप्रिलला


पुणे, 12 एप्रिल (हिं.स.)।

दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान आणि हृदयेश आर्टस् यांच्यातर्फे आयोजित दीनानाथ मंगेशकर पुरस्कार वितरण सोहळा आणि ‘मी लता दीनानाथ’ सांगीतिक मैफील’, असा कार्यक्रम २४ एप्रिलला सायंकाळी पाच ते रात्री १० या वेळेत स्वारगेटच्या गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे. या कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीला सुरुवात झाली आहे

दीनानाथ मंगेशकर यांच्या ८४ व्या स्मृतीदिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अनेक वर्षांनंतर हा पुरस्कार वितरण सोहळा पुण्यात होणार असून पुणेकरांना पुरस्कार वितरण आणि त्यानंतर ‘मी लता दीनानाथ’ ही सांगीतिक मैफील, असा भरगच्च कार्यक्रम यानिमित्ताने अनुभवता येणार आहे.

या कार्यक्रमात नोबेल पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते कैलास सत्यार्थी यांच्यासह विविध मान्यवरांना पुरस्कारांनी गौरवले जाणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर हे लता मंगेशकर यांच्या गाण्यांचा ‘मी लता दीनानाथ’ हा विशेष कार्यक्रम सादर करणार आहेत. गाण्यांसह लता मंगेशकर यांच्या आठवणींना हृदयनाथ मंगेशकर या वेळी उजाळा देतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande