छ. संभाजीनगर - वेरूळ घृष्णेश्वर विकास आराखड्यातील कामांचा जिल्हाधिकारी-यांनी घेतला आढावा
छत्रपती संभाजीनगर, 12 एप्रिल (हिं.स.) आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेरूळ घृष्णेश्वर विकास आराखड्यातील अंतर्भूत असलेल्या भक्तनिवास, शॉपिंग कॉम्प्लेक्स दर्शनबारी,रस्ते, पथदिवे , पाणी पुरवठा, शासकीय जमिनीवर अतिक्रमण काढण्याबाबत संबंधित यंत्रण
अ


छत्रपती संभाजीनगर, 12 एप्रिल (हिं.स.) आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेरूळ घृष्णेश्वर विकास आराखड्यातील अंतर्भूत असलेल्या भक्तनिवास, शॉपिंग कॉम्प्लेक्स दर्शनबारी,रस्ते, पथदिवे , पाणी पुरवठा, शासकीय जमिनीवर अतिक्रमण काढण्याबाबत संबंधित यंत्रणेकडून आढावा घेतला .

पोलीस उपविभागीय अधिकारी अपराजिता अग्निहोत्री ,सहाय्यक जिल्हाधिकारी, अंकिता ताकभाते,कन्नड उपविभागीय अधिकारी संतोष गोरड , उप वनसंरक्षक सुवर्णा माने, केंद्रीय पुरातत्व विभागाचे डॉ.शिवकुमार भगत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एस .भगत ,कार्यकारी अभियंता ,एस .जी केंद्रे ,विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता अनघा पुराणिक ,भूमि अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक चंद्रकांत सेवक,घृष्णेश्वर मंदिर ट्रस्टचे सचिव योगेश टोपरे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंदिर परिसरातील विकास कामाबरोबरच दर्शनबारी, शॉपिंग कॉम्प्लेक्स, भक्त निवासाचे काम दिलेल्या कालमर्यादेत पूर्ण करावे. जर हे काम कालमर्यादेत नाही झाले तर संबंधित कंत्राटदारावर यांच्याबाबत वाढीव निधी न देता कारवाई करण्याबाबतही निर्देशित करण्यात आले. नवीन रस्ते ,पाणीपुरवठा, वीज यंत्रणांची उर्वरित कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी गौडा यांनी बैठकीत दिले.

घृष्णेश्वर मंदिर परिसराची पाहणी करून विविध विकास कामाच्या अंतर्गत होत असलेल्या बांधकाम ,पुरातत्व विभागाअंतर्गत येणाऱ्या संरक्षित वास्तू आणि परिसराचा विकास करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला योग्य ते सूचना, निर्देश आणि सहकार्य करण्याबरोबरच वरिष्ठ पातळीवरून परवानगी मिळण्याबाबतही सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी पुरातत्त्व विभागाला केले . आगामी कालावधीत कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या विविध देशातील भक्तगण आणि नागरिकांना विविध सेवा सुविधा पुरवण्यासाठी घृष्णेश्वर विकास आराखड्यात विविध कामांचा समावेश केलेला आहे. सदरील काम पूर्ण करण्यासाठी, निविदा, कार्यादेश, तांत्रिक मान्यता व इतर अनुषंगिक निधीच्या उपलब्धतेची कार्यवाही तात्काळ मार्गे लावून काम पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे निवासस्थान कार्यान्वित करण्याबाबतही पाणीपुरवठा आणि महावितरण विभागाला निर्देशित करण्यात आले. वनविभाग अंतर्गत गिरी परिक्रमा आणि इतर अनुषंगिक आवश्यक परवानगी देण्याबाबतची पाठपुरावा करून तात्काळ संबंधित कामकाज पूर्ण करावे

पर्यटकांना तसेच येणाऱ्या भाविकांना पाणी ,पथदिवे, दर्शनवारीचे सुविधा, वाहतुकीची पर्यायी व्यवस्था. वाहनतळ , बस स्टँडची व्यवस्था, निवास व्यवस्था याबाबत विशेष लक्ष देऊन सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना आणि भक्तांना रस्त्यावर दिशादर्शक फलक आणि चिन्ह मराठी, हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषेत लावावीत जेणेकरून नागरिकांना योग्य ठिकाणी जाण्यासाठी मार्गदर्शन मिळेल. नवीन रस्ते मार्गांमध्ये पर्यायी बसवाहनतळ अंतर्भाव करण्याबरोबरच अतिक्रमण झालेल्या नागरिकांस पर्यायी जागेची व्यवस्था करण्याचे काम ही करण्याबाबत ही सूचना करण्यात आली.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande