डॉ.आंबेडकर जयंती दिनी आझम कॅम्पसची अभिवादन मिरवणूक
पुणे, 12 एप्रिल (हिं.स.)। महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस)च्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आबेदा इनामदार यांच्
Babasheab ambedkar


पुणे, 12 एप्रिल (हिं.स.)।

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस)च्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आबेदा इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता आझम कॅम्पस(पुणे कॅम्प) येथून या मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे.५ हजार विदयार्थी सहभागी होणार आहेत .

मिरवणुकीने जाऊन महात्मा गांधी रस्त्यावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे.संस्थेचे विश्वस्त,पदाधिकारी,प्राचार्य,प्राद्यापक-शिक्षक,कर्मचारी,विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी होतील.महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा.इरफान शेख यांनी माहिती दिली.

दरवर्षी महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज,म.फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात. हजारो विद्यार्थी त्यात सहभागी होतात.त्यातून महामानवांच्या सामाजिक,शैक्षणिक संदेशांचा प्रसार केला जातो.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande