
छत्रपती संभाजीनगर, 12 एप्रिल (हिं.स.)।
जिल्ह्यातील शिवसेना जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी आणि सदस्य यांच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाला शिंदे यांच्या समवेत पालकमंत्री प्रताप सरनाईक उपस्थित राहिले.
या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांचा उत्साह, नेतृत्वावरील दृढ विश्वास आणि शिवसेनेप्रती असलेली निष्ठा स्पष्टपणे जाणवत होती. संपूर्ण परिसर घोषणांनी दुमदुमला होता आणि वातावरणात एक वेगळीच ऊर्जा अनुभवायला मिळाली.
यावेळी माजी आमदार तथा शिवसेना उपनेते श्री. ज्ञानराज चौगुले तसेच जिल्ह्यातील इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis