रत्नागिरीत १८ एप्रिलला शेतकऱ्यांची बैठक
रत्नागिरी, 12 एप्रिल, (हिं. स.) : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांची विशेष सभा रत्नागिरीत येत्या १८ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. बनावट आणि निकृष्ट खते, कीटकनाशके व औषधांमुळे मोठ्या प्रमाणावर बागायतदारांचे नुकसान झाले आहे. तसेच ग्लोबल
रत्नागिरीत १८ एप्रिलला शेतकऱ्यांची बैठक


रत्नागिरी, 12 एप्रिल, (हिं. स.) : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांची विशेष सभा रत्नागिरीत येत्या १८ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे.

बनावट आणि निकृष्ट खते, कीटकनाशके व औषधांमुळे मोठ्या प्रमाणावर बागायतदारांचे नुकसान झाले आहे. तसेच ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामानातील बदल, अनियमित पाऊस, वाढलेले तापमान व कीड-रोगांचे प्रमाण वाढल्याने शेती व मच्छीमारी दोन्ही क्षेत्रांवर गंभीर परिणाम होत आहेत.

या सर्व गंभीर प्रश्नांवर चर्चा करून पुढील लढ्याची दिशा ठरविण्यासाठी शेतकऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा शनिवार, दि. १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता नाचणे रोडवरील बालाजी मंगल कार्यालयात होणार आहे.

या सभेमध्ये बनावट औषध कंपन्यांवर कारवाई, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, तसेच हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी उपस्थित राहणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व आंबा उत्पादक, काजू उत्पादक व मच्छीमार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादके विक्रेते सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश (बावा) शंकर साळवी,

माजी आमदार आणि रत्नागिरी तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाळ माने यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande