
बीड, 12 एप्रिल (हिं.स.)। भारतीय योग संस्थान दिल्ली बीड शाखेच्या सर्व केंद्रांच्या वतीने ६०वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. बीड शहरातील श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर स्थापना दिवस कार्यक्रमास छत्रपती संभाजीनगरहून विभागीय प्रधान संजय औरंगाबादकर, विभागीय मंत्री आनंद अग्रवाल, विभागीय मंत्री दिनेश देशपांडे आणि गट प्रमुख वर्षा देशपांडे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा योग संघटनेचे अध्यक्ष विनायक वझे हे उपस्थित होते.
मागील एक वर्षापासून बीड शहरातील केंद्रावर योगसाधना सुरू असून, साधकांनी अनुभव सांगितले. यावेळी बोलताना संजय औरंगाबादकर यांनी भारतीय योग जिल्हा क्रिडा संकुलाच्या मैदानावर शनिवारी भारतीय योग संस्थान दिल्ली बीड शाखेच्या सर्व केंद्राच्या वतीने ६० वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. संस्थानची उद्दिष्टे आणि नियमित योग साधनेचे फायदे सांगितले, तर वर्षा देशपांडे यांनी साधना पक्ष, ज्ञान पक्ष, सेवा पक्ष, संघटन पक्ष यावर विचार मांडले. आनंद अग्रवाल यांनी ध्यान साधना घेऊन सर्व साधकांची मने जिंकली.दिनेश देशपांडे यांनी बीड येथील नवीन योग वर्गात सेवा दिल्यामुळे त्यांचा विनायक कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis