गोठ्यातून बकऱ्यांची चोरी; अलिबागमध्ये 29,500 रुपयांचा ऐवज लंपास
रायगड, 12 एप्रिल (हिं.स.)। पोयनाड पोलीस ठाणे हद्दीत बकऱ्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 29,500 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मौजे सांबरी, महादुनगर (ता. अलि
poynad


रायगड, 12 एप्रिल (हिं.स.)। पोयनाड पोलीस ठाणे हद्दीत बकऱ्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 29,500 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मौजे सांबरी, महादुनगर (ता. अलिबाग) येथील फिर्यादी यांच्या राहत्या घरासमोरील गोठ्यात बांधलेल्या बकऱ्या अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास चोरून नेल्या. ही घटना उघड होताच फिर्यादीने पोयनाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या उद्देशाने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ही चोरी करण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 43/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 305(+) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार अमोल घरत करीत आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी रात्रीच्या वेळी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande