हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रवासी संख्येत वाढ
पुणे, 12 एप्रिल (हिं.स.)। हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्येत वाढ अपेक्षित असल्याने आधीच्या दोन मार्गावरील डबे वाढवणार असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. त्यासाठीचा अहवाल मेट्रो तयार करत अ
Metro Train


पुणे, 12 एप्रिल (हिं.स.)।

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्येत वाढ अपेक्षित असल्याने आधीच्या दोन मार्गावरील डबे वाढवणार असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. त्यासाठीचा अहवाल मेट्रो तयार करत असल्याचे ते म्हणाले. सध्या पिंपरी चिंचवड ते स्वारगेट, वनाझ ते रामवाडी मेट्रोचा दिवसाला २ लाखांच्या आसपास प्रवासी वापर करत आहेत.

त्यांसाठी सध्या तीन डबे वापरात आहे. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सुरू झाल्यावर प्रवासी संख्येत एक ते दीड लाखांची वाढ अपेक्षित आहे. मेट्रोला होणारी गर्दी पाहता विस्तारित मार्गिकांसाठी दोन टप्प्यात १२ आणि १५ गाड्या नव्याने दाखल होतील. सध्यादोन मार्गावर ३४ गाड्या चालू असून त्यांना १०२ डबे आहेत. तिसरा मार्ग आणि टप्पा दोनचा विचार करता अजून २७ गाड्या आणि एकूण ८१ डब्बे असतील.

विस्तार, नव्या मार्गिकांचे काम २०३० पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. खडकवासला-खराडी मार्ग नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरून जाणार असून त्यानुसार या रस्त्यावर उड्डाणपूल उभारल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजीनगर बसस्थानकासंदर्भात महामेट्रो आणि राज्य परिवहनव महामंडळातील कराराचा अंतिम मसुदा तयार झाला असून त्यावर महामंडळाच्या बैठकीत चर्चा होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande