थोर विचारवंत कै. जनार्दन वाघमारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
लातूर, 12 एप्रिल (हिं.स.)। माजी कुलगुरू, माजी खासदार आणि थोर विचारवंत कै. जनार्दन वाघमारे यांना लातूर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. लिंगायत शरण फाउंडेशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात त्यांच्या कार्या
जनार्दन वाघमारे


लातूर, 12 एप्रिल (हिं.स.)।

माजी कुलगुरू, माजी खासदार आणि थोर विचारवंत कै. जनार्दन वाघमारे यांना लातूर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. लिंगायत शरण फाउंडेशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात त्यांच्या कार्याचा व विचारांचा समाजावर झालेला प्रभाव अधोरेखित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी कै. जनार्दन वाघमारे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि प्रबोधनाच्या क्षेत्रात त्यांनी दिलेले मोलाचे योगदान अधोरेखित केले. समाजातील वंचित घटकांसाठी त्यांनी केलेले कार्य, तसेच प्रगत आणि समताधिष्ठित विचारांचा प्रसार ही त्यांची मोठी देणगी असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.

त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढ्यांनी घेऊन समाज विकासासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. कै. वाघमारे यांनी आयुष्यभर ज्ञान, समता आणि सामाजिक परिवर्तन यांसाठी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे सर्वांनी एकमुखाने सांगितले.

या श्रद्धांजली कार्यक्रमास लिंगायत शरण फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲड. माधवराव पाटील, प्रा. राजेश विभुते, प्रा. सिद्राम डोंगरगे, विजयकुमार गुते, शरद चौधरी, शेखर हवीले, गुरु बिराजदार, गुरुनाथ उचेकर, खोबरे आप्पा आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande