TQCEBT 26 आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न; १२ देशांतील तज्ज्ञांचा सहभाग
रायगड, 12 एप्रिल (हिं.स.) - लवासा कॅम्पस येथे IEEE प्रायोजित ‘TQCEBT’26’ (क्वांटम कंप्युटिंग आणि उदयोन्मुख व्यावसायिक तंत्रज्ञानातील प्रवाह) ही आंतरराष्ट्रीय परिषद ९ ते ११ एप्रिल दरम्यान यशस्वीरीत्या पार पडली. या परिषदेत १२ देशांतील प्रतिनिधींचा
lava


lava


रायगड, 12 एप्रिल (हिं.स.) - लवासा कॅम्पस येथे IEEE प्रायोजित ‘TQCEBT’26’ (क्वांटम कंप्युटिंग आणि उदयोन्मुख व्यावसायिक तंत्रज्ञानातील प्रवाह) ही आंतरराष्ट्रीय परिषद ९ ते ११ एप्रिल दरम्यान यशस्वीरीत्या पार पडली. या परिषदेत १२ देशांतील प्रतिनिधींचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्यात आला असून, संस्थेची जागतिक शैक्षणिक ओळख अधिक दृढ झाली आहे.

उच्च दर्जाच्या संशोधनाची प्रचिती देत, एकूण २,०३६ प्राप्त संशोधन निबंधांपैकी ३९२ निबंधांची निवड कठोर परीक्षण प्रक्रियेनंतर मायक्रोसॉफ्ट सीएमटी प्रणालीद्वारे करण्यात आली. परिषदेत क्वांटम संगणन, जनरेटिव्ह कृत्रिम बुद्धिमत्ता, एज इंटेलिजन्स, जबाबदार डेटा अभियांत्रिकी आणि AI-आधारित निर्णय प्रणाली यांसारख्या अत्याधुनिक विषयांवर सखोल चर्चा झाली.

तीन दिवस चाललेल्या या परिषदेत सहा विषयक विभाग आणि सात तांत्रिक सत्रांमधून जागतिक तज्ज्ञांनी केवळ तांत्रिक प्रगतीच नव्हे, तर त्यासंबंधित नैतिकता आणि नियामक पैलूंचाही सविस्तर ऊहापोह केला.

शैक्षणिक चर्चेबरोबरच एंटरप्राइझ ऑटोमेशनसाठी GenAI आणि एजेंटिक सिस्टीम्सच्या साहाय्याने उभारणी करणे या विषयावर प्रत्यक्ष कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेमुळे सहभागींस व्यावहारिक अनुभव आणि कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली. परिषदेला C-DAC, पुणे येथील डॉ. राजेश त्रिपाठी यांच्या समारोपपर भाषणाने सांगता झाली.

रेव्ह. डॉ. फा. लिजो थॉमस आणि रेव्ह. जस्टिन पी. वर्गीस यांच्या मार्गदर्शन, सेच डॉ. विजयलक्ष्मी (आयोजक अध्यक्ष), डॉ. जयंथ महाजन व डॉ. पूर्णेंदु आचार्जी (सर्वसाधारण अध्यक्ष), आणि प्रा. शरद गुप्ता (समन्वयक) यांच्या नेतृत्वात ही परिषद आयोजित करण्यात आली.

ही परिषद शैक्षणिक संशोधन आणि औद्योगिक व्यवहार यांच्यातील दुवा अधिक मजबूत करत, जागतिक सहकार्य आणि नवोन्मेषासाठी एक प्रभावी व्यासपीठ म्हणून उदयास आली आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या: https://tqcebt.christuniversity.in/

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande