दारू तस्करांचा पर्दाफाश; नेरळमध्ये पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई!
रायगड, 12 एप्रिल (हिं.स.)। जिल्ह्यात गावठी दारूच्या बेकायदेशीर वाहतुकीवर नेरळ पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन इसमांना अटक केली आहे. या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेरळ पोलीस ठाण
Liquor smugglers exposed; Police film style action in Neral!


Liquor smugglers exposed; Police film style action in Neral!


Liquor smugglers exposed; Police film style action in Neral!


रायगड, 12 एप्रिल (हिं.स.)। जिल्ह्यात गावठी दारूच्या बेकायदेशीर वाहतुकीवर नेरळ पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन इसमांना अटक केली आहे. या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 70/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (ई), 83 प्रमाणे दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी पहाटे 4:31 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक दलाल मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आंतरजिल्हा सीमेजवळील सेलू चेकपोस्ट येथे पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली होती. दरम्यान, वांगणीकडून नेरळकडे येणारा पिकअप टेम्पो (क्रमांक MH-05-EL-6114) संशयास्पदरीत्या थांबवण्यात आला. चालकाने टेम्पो रिकामा असल्याचे सांगत अचानक वाहन पळवून नेण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर पोलिसांनी तत्काळ सतर्कता दाखवत पाठलाग केला आणि नेरळ पोलीस ठाण्यासमोर संबंधित टेम्पो अडवण्यात यश मिळवले. तपासणीदरम्यान टेम्पोत गावठी दारूचा साठा आढळून आला.

या प्रकरणात चालक शकील खालिल शेख (वय 21, रा. वसार गाव, ता. अंबरनाथ, जि. ठाणे) व त्याचा साथीदार योगेश गलधू वाहिले (वय 34) यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी टेम्पोमधून 23,625 रुपयांची गावठी दारू तसेच 3,35,000 रुपये किमतीचा पिकअप टेम्पो असा एकूण 3,58,625 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक एस. एम. शेंबडे, पोलीस हवालदार दत्ता किसवे, तसेच पोलीस शिपाई अतुल महाकाळ, कणके, आठरे, लोहार यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. दरम्यान, रायगड जिल्ह्यात बेकायदेशीर दारू व्यवसायाविरोधात पोलिसांची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून अशा कारवायांमुळे तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande