शेती पिकांवरील प्रक्रिया उद्योगामुळे शेतकरी समृद्ध होईल - आमदार सदाभाऊ खोत
लातूर, 12 एप्रिल (हिं.स.)। शेतकऱ्यांच्या शेतातील हायब्रीड ज्वारी, मका अशा पिकांवर सरकारने प्रक्रिया करून इथेनॉल निर्मिती करुन देशात इथेनॉलवर चालणारी वाहने निर्माण करावी. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजारपेठेत चांगला भाव मिळेल यातून शेतकऱ्यां
सदाभाऊ खोत


लातूर, 12 एप्रिल (हिं.स.)।

शेतकऱ्यांच्या शेतातील हायब्रीड ज्वारी, मका अशा पिकांवर सरकारने प्रक्रिया करून इथेनॉल निर्मिती करुन देशात इथेनॉलवर चालणारी वाहने निर्माण करावी. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजारपेठेत चांगला भाव मिळेल यातून शेतकऱ्यांना मोठा पैसा मिळल्याने शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस येतील, असे मत रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. धामणगाव येथे शिरुर अनंतपाळ तालुका रयत क्रांती संघटनेच्या वतीने आयोजित शेतकरी संवाद मेळावा कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच ज्ञानोबा बोळंगे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश उपाध्यक्ष राहुल मोरे, विज्ञान तंत्रज्ञान आघाडी प्रमुख मिलिंद दामले, युवा प्रदेशाध्यक्ष अरविंद पाटील, मराठवाडा अध्यक्ष शिवाजी पेठे, अध्यात्मिक प्रदेश अध्यक्ष बालाजी महाराज येरोळकर, जिल्हाध्यक्ष गणेश सुर्यवंशी, तालुकाध्यक्ष गुडेराव चौसष्टे, जि.प. सदस्य माणिक गायकवाड, पं.स. समिती सदस्य हमीद पटेल, विजय निवले उपस्थित होते.

शेतकऱ्यांना स्वतः चे प्रश्न सोडविण्यासाठी गावगाड्यातील शेतकरी संघटीत होऊन मोठा लढा उभारुन लढण्याची गरज असल्याचे सांगून आमदार खोत म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांच्या कुंटूबामध्ये एकही नौकरदार नाही त्या शेतकऱ्यांना त्यांचे मुलबाळ शिक्षण देऊन मोठे करण्यासाठी अशा कुटुंबाला दर महिन्याला सरकारने पंचवीस हजार रुपये मदत देण्याची मागणी करणार असून सरकारने शेतकरी विरोधी कायदा रद्द करावी अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी विज्ञान तंत्रज्ञान शेतकरी संघटना आघाडी प्रमुख मिलिंद दामले म्हणाले शेतकऱ्यांना सरकार कापूस, मका व सोयाबीन तणनाशक सहनशील व किड प्रतिरोधक एचबीटी बियाणे तंत्रज्ञान नाकारुन आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे. सरकारला खरेच शेतीचे उत्पन्न वाढवायचे असेल तर सरकारने एचबीटी बियाणे लागवडीसाठी केंद्र सरकारने परवानगी देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी धामणगाव येथील शेतकरी कुटुंबातील अज्ञात वाहनाच्या धडकेत मयत झालेले संजय जाधव यांच्या कुटुंबीयांची सांत्वन भेट घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande