समाधान शिबिरामध्ये महसूल सेवा उत्तम प्रकारे राबवली जात आहे – आमदार आनंदराव बोंढारकर
नांदेड, 12 एप्रिल (हिं.स.)। शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य समाधान शिबिर अभियान (टप्पा क्र. १) अंतर्गत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील तिसरे शिबिर विष्णुपुरी येथे उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास मतदारस
Q


नांदेड, 12 एप्रिल (हिं.स.)।

शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य समाधान शिबिर अभियान (टप्पा क्र. १) अंतर्गत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील तिसरे शिबिर विष्णुपुरी येथे उत्साहात पार पडले.

या कार्यक्रमास मतदारसंघाचे आमदार आनंदराव बोंढारकर यांनी उपस्थित राहून विविध विभागांच्या स्टॉल्सना भेटी दिल्या. त्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून संबंधित विभागांना त्या तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना केल्या. तहसील कार्यालयामार्फत विविध प्रमाणपत्रे विहित मुदतीत दिली जात असल्याबद्दल समाधान व्यक्त करत, एकाच ठिकाणी नागरिकांना उत्तम सेवा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्यामुळे शिबिरास परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे नियोजन करण्यात आले.

या शिबिरामध्ये ग्रामविकास, आरोग्य, कृषी, भूमिअभिलेख (मोजणी), दुय्यम निबंधक, महावितरण आदी विविध शासकीय विभागांनी सहभाग घेतला. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती देत लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारले.

तहसील कार्यालय, नांदेड यांच्यावतीने महसुली सेवांचे मोठ्या प्रमाणावर वितरण करण्यात आले. यामध्ये 702 ऑनलाईन सातबारा उतारे व 669 आठ-अ उतारे नागरिकांना देण्यात आले. तसेच 10 पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ प्रदान करण्यात आला. याशिवाय फेरफार संदर्भातील अर्जही स्वीकारण्यात आले.

शिबिरामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, सातबारा, ८-अ उतारे, सातबारा दुरुस्ती, फेरफार नोंदी आदी महसुली सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच आरोग्य, भूमिअभिलेख व पंचायत विभागांनीही विविध सेवा पुरवल्या.

तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांनी उपस्थित राहून अभियानास सहकार्य केले.

--

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande