लातूर - महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समिती जाहीर
लातूर, 12 एप्रिल, (हिं.स.) जगतज्योती महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ॲड. निलेश मुचाटे तर स्वागताध्यक्षपदी प्रा. भालचंद्र येडवे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. लातूर येथील पाचशेघर मठात लिंगायत समाजाचे ज्येष्ठ मार्
महात्मा बसवेश्वर जयंती


लातूर, 12 एप्रिल, (हिं.स.) जगतज्योती महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ॲड. निलेश मुचाटे तर स्वागताध्यक्षपदी प्रा. भालचंद्र येडवे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

लातूर येथील पाचशेघर मठात लिंगायत समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सिद्रामआप्पा पोपडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी अध्यक्ष केदारआप्पा रासुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी समाज बांधवांची बैठक पार पडली. या बैठकीत जयंती उत्सव समितीची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे — अध्यक्ष: ॲड. निलेश मुचाटे, स्वागताध्यक्ष: प्रा. भालचंद्र येडवे पाटील, उपाध्यक्ष: विश्वास आंबेकर, सचिव: बालाजी झिपरे, सहसचिव: रोहित चवळे, कोषाध्यक्ष: लखन कावळे, कार्याध्यक्ष: मुकेश उटगे, तसेच बालाजी पाटील (रायवाडीकर), गणेश हेरकर यांचा समावेश आहे.

महात्मा बसवेश्वरांचे विचार समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचवण्यासाठी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष प्रा. येडवे पाटील आणि अध्यक्ष ॲड. मुचाटे यांनी केले. अध्यक्षीय समारोप सिद्रामआप्पा पोपडे यांनी केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक केदार रासुरे यांनी केले, सूत्रसंचालन संयोजक नितीन मोहनाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन जगदीश येरटे यांनी मानले.

यावेळी उपाध्यक्ष विश्वास आंबेकर यांनी महात्मा बसवेश्वर चौकातील अश्वारूढ पुतळ्यासमोर एलईडी फलक उभारण्यासाठी स्वतःच्या खर्चातून १ लाख १० हजार रुपये देण्याची घोषणा केली.

बैठकीनंतर नूतन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. यावेळी बसवेश्वर हेंगणे, प्रा. ओमप्रकाश झुरुळे, ॲड. निखिल काळगे, सोमेश्वर ईश्वरशेटे, शिवकुमार रोडे, प्रमोद धुपे, लक्ष्मीकांत रासुरे, मन्मथ सोरटे, सुशील वेळापुरे, निखिल शेटकार, शरणाप्पा अंबुलगे, कल्याण लातूरे, मोहन मेंगशेट्टे, सुनील ताडमाडगे, किरण खोबरे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande