महावितरणच्या स्मार्ट टीओडी मीटरमुळे रत्नागिरी परिमंडलात नऊ महिन्यात 1.43 कोटीची सवलत
रत्नागिरी, 12 एप्रिल, (हिं. स.) : महावितरणकडून राज्यातील घरगुती वीजग्राहकांना स्मार्ट टीओडी (Time of Day) मीटरच्या माध्यमातून नवे तंत्रज्ञान उपलब्ध होत आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने निश्चित केलेल्या वीजदरामध्ये घरगुती ग्राहकांना दिवसाच्या
महावितरणच्या स्मार्ट टीओडी मीटरमुळे रत्नागिरी परिमंडलात नऊ महिन्यात 1.43 कोटीची सवलत


रत्नागिरी, 12 एप्रिल, (हिं. स.) : महावितरणकडून राज्यातील घरगुती वीजग्राहकांना स्मार्ट टीओडी (Time of Day) मीटरच्या माध्यमातून नवे तंत्रज्ञान उपलब्ध होत आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने निश्चित केलेल्या वीजदरामध्ये घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीज वापरामध्ये प्रतियुनिट 80 पैसे ते 1 रुपया सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार घरगुती ग्राहकांना टीओडीप्रमाणे वीज दरात सवलत मिळण्याचा प्रत्यक्ष फायदा दि. 1 जुलै 2025 पासून सुरू झाला आहे. या अंतर्गत रत्नागिरी परिमंडलातील 1 लाख 76 हजार 617 वीज ग्राहकांना नऊ महिन्यांमध्ये 1 कोटी 43 लाख 77 हजाराची सवलत मिळाली आहे.

महावितरणकडून हे स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहेत. स्मार्ट टीओडी मीटरमुळे गेल्या जुलैपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील ग्राहकांना मिळालेली महिनानिहाय सवलत अशी -

जुलै रत्नागिरी - 48 हजार 481 ग्राहकांना 3 लाख 20 हजार

सिंधुदुर्ग - 12 हजार 125 ग्राहकांना 68 हजार

ऑगस्ट - रत्नागिरी - 91 हजार 360 ग्राहकांना 11 लाख 81 हजार

सिंधुदुर्ग - 31 हजार 772 ग्राहकांना 3 लाख 98 हजार

सप्टेंबर - रत्नागिरी - 1 लाख 10 हजार 135 ग्राहकांना 15 लाख 46 हजार

सिंधुदुर्ग - 36 हजार 938 ग्राहकांना 5 लाख 48 हजार

ऑक्टोबर - रत्नागिरी - 1 लाख 1 हजार 531 ग्राहकांना 12 लाख 30 हजार

सिंधुदुर्ग - 36 हजार 7 ग्राहकांना 4 लाख 42 हजार

नोव्हेंबर - रत्नागिरी - 1 लाख 4 हजार 122 ग्राहकांना 13 लाख 28 हजार

सिंधुदुर्ग - 37 हजार 790 ग्राहकांना 4 लाख 92 हजार

डिसेंबर - रत्नागिरी - 1 लाख 5 हजार 775 ग्राहकांना 11 लाख 36 हजार

सिंधुदुर्ग - 39 हजार 629 ग्राहकांना 4 लाख 60 हजार

जानेवारी २०२६ - रत्नागिरी - 1 लाख 4 हजार 351 ग्राहकांना 9 लाख 78 हजार

सिंधुदुर्ग - 41 हजार 315 ग्राहकांना 4 लाख 23 हजार

फेब्रुवारी - रत्नागिरी - 1 लाख 13 हजार 305 ग्राहकांना 12 लाख 63 हजार

सिंधुदुर्ग - 44 हजार 626 ग्राहकांना 5 लाख 33 हजार

मार्च - रत्नागिरी - 1 लाख 29 हजार 518 ग्राहकांना 14 लाख 93 हजार

सिंधुदुर्ग - 47 हजार 99 ग्राहकांना 5 लाख 39 हजार

नव्या तंत्रज्ञानाच्या मीटरमधून स्वयंचलित मासिक रीडिंग होत असल्याने अचूक बिले मिळतात आणि घरातील विजेचा वापर दर अर्ध्या तासाला संबंधित ग्राहकांना मोबाइलवर पाहता येतो. त्यामुळे वीज वापरावरदेखील ग्राहकांचे थेट नियंत्रण राहते. सकाळी 9 सायंकाळी ते 5 वाजेपर्यंत वीजग्राहक घरातील प्रामुख्याने वॉशिंग मशीन, गिझर, इस्त्री, एअर कंडिशनर व जास्त वीज वापर असणाऱ्या इतर उपकरणांचा वापर करू शकतात. त्यात टीओडी मीटरमुळे ग्राहकांचा मोठा आर्थिक फायदा होत आहे.

टाइम ऑफ डे प्रणालीनुसार वीज वापराच्या कालावधीनुसार दर आकारणी केली जाते. औद्योगिक ग्राहकांनंतर घरगुती ग्राहकांना प्रथमच स्वस्त वीजदरासाठी टीओडीप्रमाणे आकारणी सुरू झाली आहे. सन 2025 ते 2030 या पाच वर्षांसाठी आयोगाने घरगुती ग्राहकांसाठी टाइम ऑफ डे (टीओडी) नुसार सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वापरलेल्या विजेसाठी प्रतियुनिट 80 पैसे ते 1 रुपया सवलत मंजूर केली आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट टीओडी मीटर घरगुती ग्राहकांकडे बसविणे आवश्यक आहे. स्मार्ट टीओडी मीटर प्रीपेड नाही, तर पोस्टपेड आहे. आधी वीज वापरा मग मासिक बिल भरा असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande