नांदेडमध्ये सामाजिक समता सप्ताह अंतर्गत मार्जीन मनी कार्यशाळा संपन्न
नांदेड, 12 एप्रिल (हिं.स.)। भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या निमित्त सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सामाजिक समता सप्ताह या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषगांने केंद्र शासनाच्या स्टँड अप योजनेंअतर्गत समाज कल्
नांदेडमध्ये सामाजिक समता सप्ताह अंतर्गत मार्जीन मनी कार्यशाळा संपन्न


नांदेड, 12 एप्रिल (हिं.स.)।

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या निमित्त सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सामाजिक समता सप्ताह या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषगांने केंद्र शासनाच्या स्टँड अप योजनेंअतर्गत समाज कल्याण कार्यालयात मार्जीन मनी कार्यशाळा संपन्न झाली.

या कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे आयडीबीआय बँक मॅनेजर रामकिशन बैनवाड यांना समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे यांच्या हस्ते भारतीय संविधानाची प्रत देवून सन्मानीत करण्यात आले. या कार्यशाळाचे अध्यक्ष समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे होते तर वरीष्ठ समाज कल्याण निरिक्षक माधवी राठोड तसेच लक्ष्मी गायके हे उपस्थित होते. या कार्यशाळेचे प्रास्तावीक वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक लक्ष्मी गायके यांनी केले असून त्यांनी नांदेड जिल्हयातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील सहभागी 40 ते 50 लाभार्थ्यांना मनी मर्जीनचे महत्व सांगून मार्गदशन केले.

बँक मॅनेजर रामकिशन बैनवाड यांनी उपस्थित नवउद्योजक यांना केंद्र शासनाच्या स्टँड अप योजनेंअतर्गत महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नवउद्योजक लाभार्थी यांना 15 टक्के मार्जीन मनी उपलब्ध करुन देण्यात येते. याबाबत सविस्तर माहिती देवून तळागाळातील उपस्थित नवउद्योजक यांना सखोल माहिती देवून मार्गदर्शन केले.

केंद्र शासनाच्या स्टँड अप मार्जीन मनी कार्यशाळेअंतर्गत अध्यक्षीय समारोपात समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे यांनी नवउद्योजकांना केंद्र शासनाच्या स्टँड अप योजनेंअतर्गत अनुसूचित व नवबौध्द घटकांतील नवउद्योजकांना 10 टक्के स्व- हिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँडॲप इंडिया योजनेंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरीत 15 टक्के मार्जीन मनी राज्य शासनार्फत देण्यात येते अशी महत्वपूर्ण माहिती देवून नवउद्योजकांना मार्गदर्शन केले.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande