परभणी महापालिकेद्वारे घरकुल लाभार्थ्यांना 23 वर्कऑर्डरचे वितरण
परभणी, 12 एप्रिल (हिं.स.)। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्ष तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने सामाजिक समता सप्ताहाचे नियोजन करण्यात आले असून, त्याअंतर्गत विविध सामाजिक, सांस्कृतिक व जनजागृ
अ


परभणी, 12 एप्रिल (हिं.स.)। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्ष तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने सामाजिक समता सप्ताहाचे नियोजन करण्यात आले असून, त्याअंतर्गत विविध सामाजिक, सांस्कृतिक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान आवास योजनेच्या 23 वर्कऑर्डरचे वितरण करण्यात आले. यासोबतच रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत बांधकाम पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना पूर्णत्व प्रमाणपत्रेही देण्यात आली.

तसेच 13 एप्रिल 2026 रोजी ‘संविधान जागर - भारतीय संविधान’ या विषयावर वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा सायंकाळी 4 वाजता बी. रघुनाथ सभागृह येथे पार पडणार आहे. यासोबतच वैद्यकीय आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सहकार्याने प्रभाग समिती ‘ब’ कार्यालय येथे सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून मिरवणुकीच्या मार्गांवरील स्वच्छतेवरही विशेष भर दिला जाणार आहे. या सर्व उपक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख, आयुक्त नितीन नार्वेकर आदींनी केले आहे.

घरकुल लाभार्थ्यांना दिलासा; 23 वर्कऑर्डरचे वितरण

सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमांतर्गत महापालिकेच्यावतीने शुक्रवारी पंतप्रधान आवास योजनेच्या 23 वर्कऑर्डरचे वितरण करण्यात आले. यासोबतच रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत बांधकाम पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना पूर्णत्व प्रमाणपत्रेही देण्यात आली. कार्यक्रमात नीता गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेल्या कार्यावर मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. तसेच डॉ. भीमराव खाडे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा आढावा घेत, 2026 हे वर्ष महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त साजरे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्या ऐतिहासिक चळवळीचे महत्त्व विशद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande