परभणी - पाणी तक्रारींवर मनपाची तात्काळ कारवाई; प्रयोगशाळेत नमुने सादर
परभणी, 12 एप्रिल (हिं.स.) परभणी महानगरपालिकेच्या हद्दीत काही भागांमध्ये स्वच्छ पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी केल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेत कारवाई केली. या तक्रारींच्या अनुषंगाने महानगरपालिका पाण
अ


परभणी, 12 एप्रिल (हिं.स.)

परभणी महानगरपालिकेच्या हद्दीत काही भागांमध्ये स्वच्छ पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी केल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेत कारवाई केली.

या तक्रारींच्या अनुषंगाने महानगरपालिका पाणीपुरवठा विभाग प्रमुख तनवीर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा अभियंता बालाजी सोनुले, हेमंत दापटीकर, उपअभियंता शेख इस्माईल, सहाय्यक अभियंता अभिजीत कुलकर्णी, सुधाकरराव देशमुख व बाळासाहेब जगताप यांच्या पथकांनी संबंधित परिसरांना भेट दिली. पथकाने गोकुळ नगर, मथुरा नगर व यशवंत नगर या भागांतील विविध घरांमधून पाण्याचे नमुने गोळा करून ते जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळेत सादर केले. तसेच काही नमुन्यांची प्राथमिक तपासणी घटनास्थळीच करण्यात आली.

प्राथमिक तपासणीत पाण्यातील ओटी (ऑक्सिजन ट्रान्सफर/ट्रीटमेंट इंडिकेटर)चे प्रमाण योग्य असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. यावेळी संबंधित भागातील नगरसेवकांसोबत चर्चा करून त्यांच्या तक्रारींचे समाधान करण्यात आले. मनपाच्या या तत्पर कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, प्रशासनाने पुढील काळातही पाणीपुरवठ्याबाबत कोणतीही तक्रार असल्यास तत्काळ कळविण्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande