गुगल सर्चमध्ये नवा एआय मोड; आता थेट रेस्टॉरंट टेबल बुकिंगची सुविधा
मुंबई, 12 एप्रिल (हिं.स.)। गुगलने भारतात आपल्या सर्चमधील एआय मोड अधिक स्मार्ट करत मोठी अपडेट जाहीर केली आहे. या नव्या अपडेटमुळे यूजर्सना आता थेट गुगल सर्चमधूनच रेस्टॉरंट शोधून टेबल बुक करता येणार आहे. यामुळे वेगवेगळ्या अॅप्स आणि वेबसाईट्सवर जाण्याच
New AI Mode in Google Search


मुंबई, 12 एप्रिल (हिं.स.)। गुगलने भारतात आपल्या सर्चमधील एआय मोड अधिक स्मार्ट करत मोठी अपडेट जाहीर केली आहे. या नव्या अपडेटमुळे यूजर्सना आता थेट गुगल सर्चमधूनच रेस्टॉरंट शोधून टेबल बुक करता येणार आहे. यामुळे वेगवेगळ्या अॅप्स आणि वेबसाईट्सवर जाण्याची गरज कमी होणार असून अनेक कामे एकाच ठिकाणी पूर्ण करण्याचा अनुभव मिळणार आहे.

या नव्या एआय मोडची खासियत म्हणजे तो यूजर्सच्या डिटेल्ड रिक्वेस्ट्स सहज समजू शकतो. उदाहरणार्थ, किती लोकांसाठी बुकिंग आहे, कोणती तारीख आणि वेळ आहे, कोणत्या भागात रेस्टॉरंट हवे आहे आणि कोणत्या प्रकारचे जेवण आवडते, अशा सर्व गोष्टी लक्षात घेऊन एआय रिअल टाइममध्ये वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर सर्च करतो. त्यानंतर तो योग्य पर्यायांची लिस्ट तयार करतो आणि उपलब्ध सीट्स तपासून थेट बुकिंग पेजचा लिंक देखील देतो. यामुळे संपूर्ण प्रोसेस एका चॅटमध्ये पूर्ण होते, जी आधी अनेक स्टेप्समध्ये करावी लागत होती.

हे फीचर गुगलच्या नॉलेज ग्राफ, मॅप्स इंटीग्रेशन आणि प्रोजेक्ट मॅरिनरच्या लाईव्ह वेब ब्राउझिंग क्षमतेवर आधारित आहे. भारतात यासाठी झोमॅटो, स्विगी आणि इझीडिनर सारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्म्ससोबत पार्टनरशिप करण्यात आली आहे. त्यामुळे रिअल टाइम उपलब्धता तपासणे आणि बुकिंग करणे अधिक सोपे झाले आहे. सध्या ही सुविधा टप्प्याटप्प्याने रोलआउट केली जात असून भविष्यात आणखी फीचर्स जोडले जाण्याची शक्यता आहे.

या अपडेटद्वारे गुगल भारतात आपल्या जेमिनी एआयला अधिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत आहे. अलीकडेच कंपनीने अनेक भारतीय भाषांमध्ये सर्च लाईव्ह सपोर्ट फीचरचा विस्तार केला आहे. आता एआय मोडमध्ये प्रॉडक्ट्सची तुलना, किंमत आणि खरेदीसाठी लिंक थेट चॅटमध्ये मिळू लागली आहे, ज्यामुळे पारंपरिक कीवर्ड सर्चची गरज कमी होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande