परभणी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रम
परभणी, 12 एप्रिल (हिं.स.)। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध सांस्कृतिक व व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 13 एप्रिल रोजी राष्ट्रीय प्रबोधन
परभणी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रम


परभणी, 12 एप्रिल (हिं.स.)।

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध सांस्कृतिक व व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

13 एप्रिल रोजी राष्ट्रीय प्रबोधनकार व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक विशाल कुमार आणि संच मुंबई यांचा समाज प्रबोधन पर भीम गीताचा बहादार कार्यक्रम असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षा पालकमंत्री मेघना बोर्डीकर तर उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा लता विजयकुमार वाकळे सह सभापती गंगाधर बोर्डीकर, नगराध्यक्ष प्रताप देशमुख तर स्वागत अध्यक्ष म्हणून सुरेश भुमरे,सचिन गोरे गोविंद थिटे, यांची उपस्थिती लाभणार आहे.

वरील सर्व सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी आयोजित केले आहे.

तर 14 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक डॉ. प्रवीण कनकुटे यांचे आजचे लोकशाही व अनुयायांची जबाबदारी या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंदराव जाधव तर कार्यक्रमाचे उद्घाटक आनंदराव भरोसे स्वागताध्यक्ष म्हणून गणेश काजळे पाटील व माजी आमदार हरिभाऊ लहाने यांचे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती तहसीलदार शितल कच्छवे, शासकीय तंत्रनिकेतन प्राचार्य गिरीश कानडे,पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, मुख्याधिकारी उमेश ढाकणे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आबासाहेब जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय मस्के,गट शिक्षणाधिकारी पोले, आदींची उपस्थित राहणार आहेत. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक निघणार आहे. अशी माहिती सार्वजनिक जयंतीचे अध्यक्ष गुणीरत्न वाकोडे उपाध्यक्ष कर्मवीर घनसावद सचिव बलवान वाकळे, कोषाध्यक्ष लखन खिल्लारे,कार्याध्यक्ष गणेश काकडे आदींनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande