शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी दुग्ध व्यवसायाला चालना; आ. डॉ. राहुल पाटील यांचा पुढाकार
परभणी, 12 एप्रिल (हिं.स.)। परभणी जिल्ह्यात धवलक्रांती घडवून आणत सर्वसामान्य शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना देण्याचा उपक्रम हाती घेतल्याची माहिती आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिली. शेतीला जोडधंदा म्हणून दुग
शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी दुग्ध व्यवसायाला चालना; आ. डॉ. राहुल पाटील यांचा पुढाकार


परभणी, 12 एप्रिल (हिं.स.)।

परभणी जिल्ह्यात धवलक्रांती घडवून आणत सर्वसामान्य शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी दुग्ध व्यवसायाला चालना देण्याचा उपक्रम हाती घेतल्याची माहिती आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिली. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय वाढविण्यावर भर देत जिल्ह्यात दररोज ५० हजार लिटर दूध उत्पादन वाढविण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर समसापूर येथे सरपंच रमेशराव चोपडे यांच्या डेअरीला भेट देऊन आ. पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

भेटीदरम्यान तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी (बीडीओ), विद्यापीठाच्या पशुसंवर्धन विभागातील अधिकारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर उपस्थित होते. साडेगाव व मिर्झापूर गावांना भेट देत ग्रामीण भागातील आरोग्य समस्या आणि दुग्ध व्यवसायातील अडचणी जाणून घेण्यात आल्या व त्यावर उपाययोजनांसाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या.

तसेच डेअरीचे सखोल निरीक्षण करत गाई-म्हशींच्या आरोग्याविषयी माहिती घेण्यात आली. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून दूध उत्पादन वाढीसाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. “दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी दैनंदिन उत्पन्नाचा विश्वासार्ह स्रोत ठरावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शेतकऱ्यांच्या समस्या व सूचनांचे स्वागत असून एकत्रित प्रयत्नातून परभणी जिल्ह्यात धवलक्रांती घडवून आणू,” असे मत आ. डॉ. राहुल पाटील यांनी व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande