बीड जिल्ह्यातील २,३६० विद्यार्थ्यांची 'आरटीई' प्रवेशासाठी निवड; पालकांची प्रतीक्षा संपली
बीड, 12 एप्रिल (हिं.स.)। शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५ टक्के राखीव जागांवर मोफत प्रवेश मिळवण्यासाठी प्रतीक्षा करणाऱ्या पालकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील २१४ शाळांमधील एकूण २,४२५ जागांपैकी २,३६० विद्यार्थ्यांची पहिल्या निव
बीड जिल्ह्यातील २,३६० विद्यार्थ्यांची 'आरटीई' प्रवेशासाठी निवड; पालकांची प्रतीक्षा संपली


बीड, 12 एप्रिल (हिं.स.)।

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५ टक्के राखीव जागांवर मोफत प्रवेश मिळवण्यासाठी प्रतीक्षा करणाऱ्या पालकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील २१४ शाळांमधील एकूण २,४२५ जागांपैकी २,३६० विद्यार्थ्यांची पहिल्या निवड यादीत निवड झाली आहे. पुणे येथे झालेल्या ऑनलाईन सोडतीनंतर ही अधिकृत यादी प्रसिद्ध करण्यात आली असून पालकांच्या मोबाईलवर संदेश पाठवण्यास सुरुवात झाली आहे. निवड झालेल्या पालकांनी आता रहिवासी पुरावा, उत्पन्नाचा दाखला आणि जातीचे प्रमाणपत्र यांसारख्या मूळ कागदपत्रांची पडताळणी मुदतीत पूर्ण करणे अनिवार्य आहे. जिल्ह्यातील एकूण ६,३३२ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले होते. उर्वरित ६५ जागांवर तांत्रिक कारणांमुळे प्रतीक्षा यादीतून प्रवेश दिले जाण्याची शक्यता असून पालकांनी आरटीईच्या अधिकृत पोर्टलवर निकाल तपासावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande