सामाजिक समता सप्ताह अंतर्गत पथनाट्य व लघुनाटिकेद्वारे योजनांचा जागर
नांदेड, 12 एप्रिल (हिं.स.)। डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत पथनाट्य व लघुनाटिकेद्वारे समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्य
Q


नांदेड, 12 एप्रिल (हिं.स.)।

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत पथनाट्य व लघुनाटिकेद्वारे समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात आली.

हा कार्यक्रम हुजूर साहिब रेल्वे स्टेशन, मध्यवर्ती बसस्थानक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात समतादूत प्रकल्पांतर्गत मुजाजी कांबळे, दिलीप सोडांरे, ज्योती जाधव, दिगांबर पोतूलवार, शेख इर्शाद, जयश्री गायकवाड, दिपाली हाडोळे, राणी पद्मावती बंडेवार, शारदा माळे, नागनाथ कोलमारे, बालाजी डूमणे यांनी पथनाट्य सादर करून उपस्थित नागरिकांचे प्रबोधन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande