महामानवांना अनोखी मानवंदना; बीडमध्ये १२५४ विद्यार्थ्यांनी केले सलग १८ तास वाचन
बीड, 12 एप्रिल (हिं.स.)। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त बीडमधील तुलसी शैक्षणिक समूहाने सलग १८ तास वाचनाचा स्तुत्य उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि महापुरुषांचे व
अ


बीड, 12 एप्रिल (हिं.स.)।

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त बीडमधील तुलसी शैक्षणिक समूहाने सलग १८ तास वाचनाचा स्तुत्य उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि महापुरुषांचे विचार रुजावेत या उद्देशाने संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम पार पडला. या उपक्रमात १,२५४ विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या चरित्रांचे उत्साहात वाचन केले. गेल्या वर्षी ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, मात्र यंदा ही संख्या अडीच पटीने वाढली आहे. या अभिनव उपक्रमामुळे जिल्ह्यात वाचन संस्कृतीला मोठी चालना मिळाली असून विद्यार्थ्यांच्या वैचारिक जागृतीसाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande