
छत्रपती संभाजीनगर, 12 एप्रिल (हिं.स.)। जिल्हाधिकारी विनायक गौडा यांनी तहसील कार्यालयातील महसूल विषयक कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच ते खुलताबाद येथे आले.
खुलताबाद तहसीलच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात आलेले लाभ, प्रलंबित फेरफार, जनगणनाविषयक कामकाज भूसंपादन व घरकुलासाठी आवश्यक असणाऱ्या वाळू उपलब्ध बाबत आढावा घेण्यात आला. तलाठी स्तरावर एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीत प्रलंबित असलेल्या फेरफार बाबत संबंधित तलाठ्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन त्यावर खुलासा मागून घ्यावा व त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश तहसीलदार यांना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis