अमरावतीत ‘एनराईज बाय सयाजी’ हॉटेलचे उद्घाटन
अमरावती, 12 एप्रिल (हिं.स.) : भारतातील उदयोन्मुख शहरांमध्ये विस्तार करत सयाजी हॉटेल्स यांनी अमरावती येथे ‘एनराईज बाय सयाजी’ या आधुनिक हॉटेल प्रकल्पाच्या उद्घाटनाची घोषणा केली आहे. शहराच्या सामाजिक व व्यावसायिक विकासाला चालना देण्यासाठी उभारण्यात आ
अमरावतीत ‘एनराईज बाय सयाजी’ हॉटेलचे उद्घाटन


अमरावती, 12 एप्रिल (हिं.स.) : भारतातील उदयोन्मुख शहरांमध्ये विस्तार करत सयाजी हॉटेल्स यांनी अमरावती येथे ‘एनराईज बाय सयाजी’ या आधुनिक हॉटेल प्रकल्पाच्या उद्घाटनाची घोषणा केली आहे. शहराच्या सामाजिक व व्यावसायिक विकासाला चालना देण्यासाठी उभारण्यात आलेले हे हॉटेल एनएच-6, नागपूर महामार्गावर रणनीतिकदृष्ट्या वसलेले आहे.

अमरावती हे समृद्ध सांस्कृतिक वारसा, धार्मिक महत्त्व आणि शैक्षणिक तसेच व्यावसायिक केंद्र म्हणून वेगाने विकसित होत असून महाराष्ट्रातील महत्त्वाचे उदयोन्मुख शहर म्हणून ओळख निर्माण करत आहे. नागपूरच्या जवळ असलेले हे शहर उत्तम रस्ते व रेल्वे संपर्कामुळे व्यावसायिक प्रवास आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

‘एनराईज बाय सयाजी, अमरावती’मध्ये एकूण 82 सुसज्ज खोल्या असून ग्रांड, ग्रांड ट्विन, एक्झिक्युटिव्ह ग्रांड आणि प्रीमियम ग्रांड अशा विविध श्रेणींमध्ये पाहुण्यांना उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. व्यवसायिक तसेच पर्यटनासाठी येणाऱ्या प्रवाशांसाठी आरामदायी आणि आधुनिक निवासाची सोय येथे करण्यात आली आहे.

या हॉटेलचे मुख्य आकर्षण म्हणजे त्याच्या भव्य बँक्वेट आणि इव्हेंट सुविधा. ‘महल’, ‘ज्वेल’ आणि ‘सॉलिटेअर’ या इनडोअर हॉल्ससह ‘वृंदावन’ आणि ‘वाटिका’ या प्रशस्त आउटडोअर जागा, तसेच विवाह सोहळे व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी खास अॅम्फीथिएटर येथे उपलब्ध आहे. सुमारे 2 हजार पाहुण्यांची क्षमता असल्यामुळे हे हॉटेल लग्नसमारंभ, कॉर्पोरेट कार्यक्रम आणि मोठ्या समारंभांसाठी आदर्श ठरणार आहे.हॉटेलमधील ‘मोमेंट’ हे ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट विविध बहुराष्ट्रीय खाद्यपदार्थांची मेजवानी देत पाहुण्यांना उत्कृष्ट जेवणाचा अनुभव प्रदान करते.

या उद्घाटनाबाबत कंपनीचे ऑपरेशन्स डायरेक्टर अजय कनोजिया म्हणाले की, “वेगाने विकसित होत असलेल्या शहरांमध्ये दर्जेदार आणि आधुनिक आतिथ्य सेवा देण्याचा आमचा उद्देश आहे. अमरावतीसारख्या क्षमतावान बाजारपेठेत हा प्रकल्प आमच्या वचनबद्धतेची पूर्तता करतो.”

तसेच मणिरत्न ग्रुप एलएलपीचे संचालक स्वप्नील सोनी यांनी सांगितले की, “सयाजी हॉटेल्ससोबत भागीदारी करत अमरावतीत हा महत्त्वपूर्ण प्रकल्प साकारताना आनंद होत आहे.

शहरातील मोठ्या कार्यक्रमांसाठी तसेच आधुनिक प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे हॉटेल महत्त्वाची भूमिका बजावेल.”

रणनीतिक स्थान, आधुनिक सुविधा आणि उत्कृष्ट सेवा यामुळे ‘एनराईज बाय सयाजी, अमरावती’ हे हॉटेल पर्यटक आणि स्थानिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार असून, विदर्भातील आतिथ्य क्षेत्रात नवा मापदंड स्थापित करेल. ---------------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande