राष्ट्रीय ई-बाईक स्पर्धेत ए. पी. शाहची दुहेरी कामगिरी; विद्यार्थिनींचा ठसा
ठाणे, 12 एप्रिल (हिं.स.)। शहराच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरत, *ए. पी. शाह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने* ग्रेटर नोएडा येथील गालगोटिया विद्यापीठात आयोजित *SIEP ई-बाईक चॅलेंज 2026* स्पर्धेत उल्लेखनीय दुहेरी यश संपादन केले आहे. या यशामध्य
Thane


ठाणे, 12 एप्रिल (हिं.स.)। शहराच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरत, *ए. पी. शाह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने* ग्रेटर नोएडा येथील गालगोटिया विद्यापीठात आयोजित *SIEP ई-बाईक चॅलेंज 2026* स्पर्धेत उल्लेखनीय दुहेरी यश संपादन केले आहे. या यशामध्ये विशेष लक्ष वेधून घेतले ते म्हणजे संघातील विद्यार्थिनींचा प्रभावी सहभाग.

देशभरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांशी स्पर्धा करताना ए. पी. शाहच्या *मॉडिफाइड ऑटो क्लब (MAC)* संघाने उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य आणि नाविन्यपूर्ण डिझाइनच्या जोरावर फ्यूचर अवॉर्ड पटकावला. यासोबतच, संघातील विद्यार्थिनीने बेस्ट वुमन पार्टिसिपंट अवॉर्ड जिंकत संपूर्ण स्पर्धेत आपला ठसा उमटवला.

विशेष म्हणजे, या प्रकल्पात विद्यार्थिनींचा सक्रिय सहभाग असून त्यांनी डिझाइन, संशोधन आणि प्रत्यक्ष निर्मिती प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली. पुरुषप्रधान मानल्या जाणाऱ्या ऑटोमोबाईल क्षेत्रात त्यांनी आत्मविश्वासाने आणि कौशल्याने कामगिरी करत नवा आदर्श निर्माण केला आहे.

या प्रकल्पाला सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमोल शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच टाटा केमिकल्स आणि इनर्शिया लॅब यांच्या उद्योग सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च कार्यक्षमतेची आणि पर्यावरणपूरक ई-बाईक विकसित करता आली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उत्तम कोळेकर तसेच पार्श्वनाथ चॅरिटेबल ट्रस्टच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करत, विद्यार्थिनींच्या यशाचा उल्लेख करताना ही कामगिरी इतर मुलींनाही तांत्रिक क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असे नमूद केले.

हे यश ए. पी. शाहच्या प्रायोगिक शिक्षणावर, उद्योग सहकार्यावर आणि विशेषतः महिला सक्षमीकरणावर दिलेल्या भराचे प्रतीक मानले जात आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande