विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मिळाली चालना; श्रीवर्धनमध्ये शिबिराची रंगत
रायगड, 12 एप्रिल (हिं.स.)। पीएम श्री उपक्रमांतर्गत श्रीवर्धन नगर परिषद शाळा क्र. १ येथे दि. ०६ एप्रिल ते १० एप्रिल २०२६ दरम्यान पाच दिवसीय “उन्हाळी शिबीर” उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिरात एकूण १३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत शिक्षणासोब
Students-creativity-gets-a-bo


रायगड, 12 एप्रिल (हिं.स.)। पीएम श्री उपक्रमांतर्गत श्रीवर्धन नगर परिषद शाळा क्र. १ येथे दि. ०६ एप्रिल ते १० एप्रिल २०२६ दरम्यान पाच दिवसीय “उन्हाळी शिबीर” उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिरात एकूण १३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत शिक्षणासोबतच विविध कलात्मक व क्रीडा उपक्रमांचा आनंद लुटला.

“चार भिंतीतील शिक्षणापेक्षा मुक्त वातावरणात स्वःचा शोध घेणे” ही संकल्पना लक्षात घेऊन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात चित्रकला, कथाकथन, सृजनात्मक लेखन, नृत्य, हस्तकला, कॅम्पिंग, गायन-वादन तसेच साहसी आणि मैदानी खेळांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी वादविवाद व वक्तृत्व स्पर्धेतही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

शिबिराचे उद्घाटन उपनगराध्यक्ष अनंत गुरव यांच्या हस्ते झाले, तर सभापती बाळकृष्ण गोरनाक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शाळेचे मुख्याध्यापक दिपक गायकवाड यांनी या शिबिरामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, संघभावना आणि तंदुरुस्तीला चालना मिळाल्याचे सांगितले.

विविध उपक्रमांसाठी राऊत सर, वैद्य मॅडम, शैलेन्द्र ठाकूर सर आणि वाडिया सर यांसारख्या तज्ञ मार्गदर्शकांचे सहकार्य लाभले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश कुडगावकर यांनीही मोलाचे योगदान दिले.

शिबिराचा समारोप विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाने करण्यात आला. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष अतुलजी चौगुले व केंद्र प्रमुख करंजकर सर उपस्थित होते. पालक व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande