ठाणे - शेअर मार्केटच्या नावाने हजारो गुतवणूकदारांना फसवणारे भामटे मोकाट
ठाणे, 12 एप्रिल (हिं.स.)। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठया प्रमाणात परतावा मिळेल, असे आमिष दाखवून तसेच लोकांना संमोहित करून तिघाजणांनी हजारो गुतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरह
ठाणे - शेअर मार्केटच्या नावाने हजारो गुतवणूकदारांना फसवणारे भामटे मोकाट


ठाणे, 12 एप्रिल (हिं.स.)।

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठया प्रमाणात परतावा मिळेल, असे आमिष दाखवून तसेच लोकांना संमोहित करून तिघाजणांनी हजारो गुतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिसांकडून मुख्य आरोपीना अटक केली जात नाही, असा आरोप गुतवणूकदारानी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, या प्रकरणी सखोल चौकशी करून तिन्ही आरोपीना आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या सर्वानाच जेरबंद करावे आणि गुतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे. तसेच, या प्रकरणी गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांचे कौतूक करून फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आवाहनही प्रधान यांनी केले आहे.

शेअर मार्केटच्या माध्यमातून दामदुप्पट फायदा करून देण्याचे आमिष दाखवून सुमारे एक हजार गुंतवणूकदारांची फसणूक करण्यात आलेली आहे. या गुतवणूकदारानी मनोज प्रधान यांच्या उपस्थित पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषेदत मनोज प्रधान यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यां भामट्यांचा पर्दाफाश केला.

प्रधान यांनी सांगितले की, श्रीजी विले को. ऑप. सोसायटी, नितीन कंपनी समोर, ठाणे (प) येथे राहणारे सचिन बाळकृष्ण राणे, प्रिती सचिन राणे, यांनी शेअर मार्केट ट्रेनिंग क्लासच्या माध्यमातून मराठी भाषिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यास सुरुवात केली. त्यांनी गुंतवणूकदारांना सागर करिवडेकरमार्फत गुंतवणूक केल्यास दरमहा ४ ते ५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. डिसेंबर २०२५ पर्यंत त्यांनी १,२४६ गुंतवणूकदारांची नोंदणी केली होती. ज्याअंतर्गत एकूण १८५ कोटी रुपये गुंतवले गेले होते. प्रीती राणे या लोकांना जाळ्यात ओढायच्या आणि पैसे करिवडेकरच्या खात्यात जमा करायला सांगायच्या. विश्वास संपादन करण्यासाठी करिवडेकरसोबत एक सामंजस्य करार करण्यात आला होता, ज्यावर सचिन राणे यांनी 'मार्गदर्शक' म्हणून स्वाक्षरी केली होती. ज्या खात्यात गुंतवणूकदारांनी पैसे जमा केले होते, त्या खात्यातून राणे कुटुंबीयांचे नातेवाईक, ज्यात त्यांचे आई-वडील, भाऊ आणि बहीण यांचा समावेश आहे, यांना कोट्यवधी रुपयांची रक्कम मिळाली. या सर्वांना सहआरोपी करावे.

ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सचिन राणे आणि सागर करिवडेकर यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. सध्या दोन्ही मुख्य आरोपी फरार आहेत. तर, या प्रकरणात लोकांना जाळ्यात ओढणारी प्रीती राणे इच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे समजते. या तिघांनाही तत्काळ अटक करावी, अशी मागणक प्रधान यांनी केली आहे.

गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन सचिन बाळकृष्ण राणे, प्रिती सचिन राणे आणि सागर करिवडेकर यांच्या कुटुंबीयांनी कोट्यवधी रुपये कमावले असून त्याचा बँक स्टेटमेंटनुसार तपशील पुढील प्रमाणे आहे.

मोरे कुटुंब (प्रीती राणे यांचे नातेवाईक):

नरेश मोरे: २.७६ कोटी रुपये

रेखा एन. मोरे: ५.८३ कोटी रुपये

एकूण: ८.५९ कोटी रुपये

कुडतरकर कुटुंब (सचिन राणे यांची बहीण सरोज यांचे कुटुंब):

संदीप कुडतरकर, सरोज कुडतरकर आणि स्वरूप कुडतरकर: ४.५६ कोटी रुपये

राणे कुटुंब:

सचिन बी. राणे: १०.१३ कोटी रुपये

प्रीती राणे: ४.७३ कोटी रुपये

सुहास बी. राणे (भाऊ): ४८.३० लाख रुपये

एकूण: १५.५५ कोटी रुपये

इतर:

तन्वी सुर्वे (भाची): ६३.१७ लाख रुपये

श्रेयस केरकर (मित्र): २.९७ कोटी रुपये

सर्व एकत्रित एकूण रक्कम: ३२ कोटी रुपये

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande