अमरावती जिल्हा वकील संघाची निवडणूक जाहीर
आगामी ३० एप्रिलला मतदान, १ मे रोजी निकाल अमरावती, 12 एप्रिल (हिं.स.)। अमरावती जिल्हा वकील संघाच्या वार्षिक सर्वसाधारण निवडणुकीचा बिगूल वाजला असून ३० एप्रिल रोजी मतदान आणि एक मे रोजी निकाल जाहीर केल्या जाणार आहे. या निवडणुकीतून २०२६-२०२७ या वर्षाकर
जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीचा बिगूल वाजला ३० एप्रिलला मतदान : एक मे रोजी मतमोजणी


आगामी ३० एप्रिलला मतदान, १ मे रोजी निकाल

अमरावती, 12 एप्रिल (हिं.स.)। अमरावती जिल्हा वकील संघाच्या वार्षिक सर्वसाधारण निवडणुकीचा बिगूल वाजला असून ३० एप्रिल रोजी मतदान आणि एक मे रोजी निकाल जाहीर केल्या जाणार आहे. या निवडणुकीतून २०२६-२०२७ या वर्षाकरिता नवीन कार्यकारिणी निवडल्या जाणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, ग्रंथालय सचिव या चार पदाधिकाऱ्यांसह सात कार्यकारिणी सदस्य पदांसाठी ही निवडणूक होत आहे. जिल्हा वकील संघाच्या विद्यमान कार्यकारिणीने १० एप्रिल रोजी अधिसूचना जारी केली आहे. त्यात तात्पुरती मतदानयादी जारी करण्यात आली आहे. १७ एप्रिल २०२६ रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार असून, २० एप्रिल रोजी फॉर्म भरण्याची प्रक्रिया होईल.

२१ एप्रिल रोजी आलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी होऊन निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केल्या जाईल. २२ एप्रिल रोजी आक्षेप स्वीकारल्या जाऊन त्याच दिवशी त्यावर निवडणुकीकरिता असलेल्या समितीसमोर सुनावणी होईल. २२ एप्रिल रोजी घेतलेल्या आक्षेपांची सुनावणी होईल. २४ एप्रिल रोजी इच्छूक उमेदवारांना त्यांचे उमेदवारी अर्ज सकाळी ११ ते दुपारी दोन वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता निवडणूक रिंगणात कायम असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केल्या जाईल. गुरुवारी (ता. ३०) सकाळी १० ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया जिल्हा न्यायालय परिसरात पार पडणार आहे.

गतवर्षीच्या निवडणुकीमध्ये एक हजार ५९४ वकिलांपैकी एक हजार ४९० मतदारांनी मतदान केले होते.मतमोजणी एक मे रोजी २०२५-२०२६ च्या निवडणुकीपासून मतदान झाल्यावर दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया राबविल्या गेली होती. तीच प्रक्रिया नवीन कार्यकारिणीसाठी होत असलेल्या निवडणुकीच्या वेळीसुद्धा कायम ठेवण्यात आली आहे, असे जिल्हा वकील संघाचे सचिव अमोल मुरळ यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande