
डोंबिवली, 12 एप्रिल (हिं.स.)।
विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनसमोर दोन इसम संशयीतरित्या फिरत असल्याचे दिसताच कोळसेवाडी पोलिसांना दिसले. हे इसम वाहनांकडे पाहत होते. चोरी करण्याच्या उद्देशाने हे इसम वाहनांकडे पाहत असावेत असा संशय पोलिसांना आला. पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले. यातील एकजण अल्पवयीन आहें.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुभम उर्फ शिवम संपत पठारे, (वय २४) रा. उल्हासनगर असे अटक केलेल्या एकाचे नाव आहे. वाढते वाहन चोरीचे गुन्हे लक्षात घेता पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त, कल्याण विभाग, कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव, पोलीस निरीक्षक (गुन्हे), गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चोरीतील आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते.
3 तारखेला पोलीस शिपाई सुरेंद्र इंगळे यांना विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन समोर दोन इसम हे संशयीतरित्या उभ्या करून ठेवलेल्या गाडयांची पाहणी करत आहेत अशी बातमिदारांमार्फत माहिती मिळाली. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. भा.द.वि.क. ३०३ (२) प्रमाणे दाखल गुन्हयातील चोरीस गेलेली एक्सेस १२५ कंपनिची
स्कुटी क. MH05/EN-5871 ही जप्त करण्यात आली. आहे. सदर गुन्हयात अटक शुभम उर्फ शिवम संपत पठारे यास अटक करून त्याचेकडे केलेल्या तपासात ३,५५,००० रुपये किमतीच मोटारसायकल जप्त करण्यात आली.. सदरची वाहने विठठलवाडी, महात्मा फुले चौक, उल्हासनगर येथुन चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहेत. मोटारसायकल चोरीचे एकुण ०८ गुन्हे उघड करण्यात आलेले आहेत, सदर गुन्हयाचा तपास पोलीस हवा २१५ दत्तु जाधव, कोळसेवाडी पोलीस ठाणे हे करत आहेत.
सदरची कामगिरी मा.पोलीस उप आयुक्त (कल्याण ) अतुल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त, कल्याण विभाग कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव, पोलीस निरीक्षक (गुन्हे), गणेश न्हायदे, कोळसेवाडी पोलीस ठाणे, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि संदिप भालेराव पोलीस उपनिरीक्षक जगन सापटे, पोहवा कापडी, बोरसे, सांगळे,पोहवा सौंदाणे, सांगळे, वाघ, घुगे, आव्हाड, जाधव, बुधवंत, पोना फटांगरे, पोना कोती,पोशि इंगळे, खरे, सोनावळे गिते यांनी केलेली आहे.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi