सोलापूर - विमा योजनेच्या रूग्णालयात डायलेसिसच्या युनिटला मंजुरी
सोलापूर, 12 एप्रिल (हिं.स.) होटगी रोडवरील राज्य कामगार विमा योजनेच्या रूग्णालयात डायलेसिसच्या युनिटला मंजुरी मिळाली आहे. येथे आधुनिक पध्दतीचे आठ मशीन दाखल झाल्या आहेत. यातील चार मशीन बसविण्यात असून अन्य चार बसवण्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. आठ
सोलापूर - विमा योजनेच्या रूग्णालयात डायलेसिसच्या युनिटला मंजुरी


सोलापूर, 12 एप्रिल (हिं.स.)

होटगी रोडवरील राज्य कामगार विमा योजनेच्या रूग्णालयात डायलेसिसच्या युनिटला मंजुरी मिळाली आहे. येथे आधुनिक पध्दतीचे आठ मशीन दाखल झाल्या आहेत. यातील चार मशीन बसविण्यात असून अन्य चार बसवण्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. आठ मशिनच्या डायलेसिस युनिटमुळे त्याचा लाभ शहर जिल्ह्यातील साखर उद्योगांसह अन्य कंपन्यातील कामगारांना होईल. किडनीच्या आजाराने त्रस्त कामगार असलेल्या रूग्णांना व त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांवर पूर्णपणे मोफत डायलेसिसचे उपचार केले जाणार आहेत.

येथील विमा रूग्णालयात अनेक नवनवीन बदल होत असून या आरोग्य संस्थेत किडनीच्या आजाराने त्रस्त कामगारांना त्यांच्या उपचारासाठी अनेक उपाययोजना आखल्या जात आहेत. येथे अत्याधुनिक पध्दतीच्या डायलेसिस युनिटसाठी आठ मशीन मंजूर आहेत. यातील चार मशीन बसवलेले असून अन्य चार मशीन बसवण्याचे काम देखील अंतिम टप्प्यात आहे. मुत्रपिंडाने त्रस्त रूग्णांचे (किडनी) नीट काम करत नसेल तर अशावेळी रक्तातील विषारी घटक बाहेर काढण्याची प्रक्रिया याद्वारे केली जाते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande