डोंबिवलीत एक हजार कुटुंबियांचा पाणी प्रश्न सुटला, साईनगर परिसर टॅंकरमुक्त
डोंबिवली, 12 एप्रिल (हिं.स.)। पश्चिमेकडील अनमोल नगरीजवळील साईनगर परिसरात अनेक महिन्यापासून पाण्याची बिकट समस्या होती. भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक प्रकाश भोईर आणि माजी नगरसेविका सरोज भोईर यांन
Photo1


डोंबिवली, 12 एप्रिल (हिं.स.)।

पश्चिमेकडील अनमोल नगरीजवळील साईनगर परिसरात अनेक महिन्यापासून पाण्याची बिकट समस्या होती. भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक प्रकाश भोईर आणि माजी नगरसेविका सरोज भोईर यांनी या समस्येवर पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. भाजपा कार्यकर्ते संदीप ( रमा म्हात्रे ) व साईनाथ मढवी यांनी त्याच्या मालकीच्या जागेतून नवीन पाण्याची लाईन जाण्यास मंजुरी दिली. परिणामी येथील एक हजार कुटुंबियांचा पाणी प्रश्न सुटला.

रविवारी उपमहापौर राहुल दामले यांनी या ठिकाणी येऊन श्रीफळ वाढविल्यानंतर पाण्याची लाईन सुरु करण्यात आली. यामुळे अनेक महिन्यापासून त्रासदायक पाणी टँकर समस्येतून येथील कुटुंबीयांची मुक्तता झाली. त्याचप्रमाणे येथील रस्तावर भाजपाच्या प्रयत्नाने पथदिवे लावण्यात आले. यावेळी उपमहापौर राहुल दामले, माजी नगरसेवक प्रकाश भोईर, माजी नगरसेविका सरोज भोईर, भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्षा प्रिया जोशी, ऍड. सौरभ ताम्हाणकर, भाजपा कार्यकर्ते संदीप ( रमा म्हात्रे), रोहिदास मढवी यांसह साईनगर मधील रहीवाशी उपस्थित होते.

आपल्या मालकी जागेवरून पाण्याची लाईन टाकण्यास मंजुरी दिल्याबद्दल संदीप म्हात्रे व मढवी यांचे उपमहापौर दामले यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. येथील रहिवाशांनी माजी नगरसेवक भोईर व माजी नगरसेविका भोईर यांचे शब्दसुमनांनी आभार मानले. दरम्यान माजी नगरसेवक प्रकाश भोईर म्हणाले, येथील एक हजार नागरिकांना आता पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही. महिला वर्गाला अत्यंत आनंद होत आहे की आता त्यांच्या घरी पुरेसे पाणी येईल. तर उपमहापौर यांनी म्हटले की, म्हात्रे व मढवी यांनी आपल्या जागेचा वापर लोककल्याणकरता केला. पाण्याची लाईन टाकण्यास मंजुरी देणे हे देवधर्म केल्यासारखेच पुण्य कर्म आहे असे सांगत संदीप म्हात्रे व मढवी यांचे कौतुक केले.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande